अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)-दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी तालुक्यातील पिलखोड येथील शाळा माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय मध्ये इयत्ता दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा मित्र मैत्रिणींचा स्नेह मेळावा संपन्न झाला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत नितीन बाविस्कर यांनी घेतली,त्यांना साथ दिली ती म्हणजे भीकन मोरे व विलास पवार यांनी.
तब्बल 25 ते 30 वर्षानंतर बालमित्र भेटणे या सारखा आनंद नाही तो शब्दात मांडता येणार नाही त्या काळातील आठवणींना उजाळा मिळाला सर्व मित्र मैत्रिणी नि आपल्या धावपळीच्या जीवनातून वेळात वेळ काढून हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला आज ग्रुप मधील बरेच विद्यार्थी हे वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनीही आपले अनुभव सांगितले
सर्वश्रेष्ठ असावी मैत्री, जगात मैत्री शाश्वत वसते हृदयात भविष्यात ही मैत्री अशीच राहील असे तिथे जमलेल्या प्रत्येकाने आपल्या मनोगतातून व्यक्त केले. एवढ्या वर्षातून सर्व मित्र-मैत्रिणींना एकत्र आणणे ही सोपी गोष्ट नाही पण ती मेहनत घेतली नितीन बाविस्कर यांनी. नि तीन बाविस्कर यांनी मुला मुलींचा एक ग्रुप बनवला व मालती राणी मनीषा वैशाली यमुना यांनीही साथ दिली.
अशाप्रकारे काहींनी आपले मनोगत व्यक्त केले तर काहींनी आभार मानून कार्यक्रमाचे सांगता केली.
