संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)- १२ एप्रिल २०२५ हनुमान जयंतीच्या निमित्ताने इनर व्हील क्लब ऑफ चाळीसगाव तर्फे सांगवी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत आरोग्य आणि जनजागृती विषयक उपक्रम आयोजित करण्यात आले. क्लबच्या अध्यक्षा डॉ. सुनीता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महिला आणि मुलींसाठी विविध सेवा व जागरूकता कार्यक्रम राबवण्यात आले.
महिला आरोग्य तपासणी शिबिर
-स्त्रीरोग तज्ञ डॉ. आसावरी पवार यांनी ३५ महिलां ची तपासणी करून त्यांना आरोग्य सल्ले व उपचार दिले.
– गर्भवती महिलांसाठी पोषण आणि प्रसूतिपूर्व काळातील काळजीविषयी मार्गदर्शन केले.
मोफत नेत्र तपासणी कार्यक्रम
– तुळशी नेत्र रुग्णालय, नाशिकच्या डॉक्टरांनी ७६ रुग्णां**च्या डोळ्यांची तपासणी केली.
– त्यापैकी २९ रुग्णांमध्ये मोतीबिंदू आढळल्याने त्यांना नाशिकमध्ये मोफत शस्त्रक्रिया साठी पाठविण्यात आले.
मुलींसाठी जागरूकता सत्र
– “चांगला स्पर्श, वाईट स्पर्श”या विषयावर ५वी ते ७वीच्या विद्यार्थिनींसाठी प्रशिक्षण सत्र घेण्यात आले.
– कल्पना महाजन (क्लब एडिटर) आणि विद्या चित्ते यांनी कथा, संवाद आणि सहभागी उदाहरणांद्वारे मुलींना सुरक्षितता आणि शारीरिक स्वायत्ततेबाबत शिकवणे दिले.
समाजातील आरोग्य आणि सुरक्षिततेबाबत जागृती साठी उपयुक्त असलेला उपक्रम राबविला .यामुळे क्लबतर्फे जनसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेत शाळकरी मुलींना जागृत करण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे इनर व्हील क्लब अध्यक्षा डॉ सुनीता पवार,सदस्य,शाळेचे प्राध्यापक आणि स्वयंसेवक यांचे सहकार्य लाभले.
