संपादक गफ्फार शेख (मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)-तालुक्यात हिवताप दिनानिमित जनजागृती करत विविध जनहितार्थ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.हिवताप,डेंग्यू, चिकुनगुनिया अश्या कीटकजन्य आजाराविषयी माहिती देत लोकांना जागृत करत या पासून कीटकजन्य आजारांपासून बचाव करण्यासाठी काळजी घेण्याचे देखील आवाहन यावेळी करण्यात आले.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर,जिल्हा शल्य चिकत्सक डॉ.किरण पाटील,जिल्हा हिवताप अधिकारी एम.एम.पाटील, यांच्या आदेशान्वये
दिनांक २५ एप्रिल २०२५ रोजी चाळीसगाव शहरात तसेच ग्रामीण भागातील सर्व प्रा.आ.केंद्र आणि अंतर्गत उपकेंद्रात जागतिक हिवताप दिनानिमित्त विविध जनजागृतीपर कार्यक्रम घेत. आरोग्य शिक्षण देण्यात आले.शहरी भागात शाळेत तसेच ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव येथे स्क्रीन वर हिवताप,डेंग्यू, चिकुनगुनिया इत्यादी कीटकजन्य आजाराविषयी व्हिडिओ दाखवून विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांना आरोग्य शिक्षण देण्यात आले. हिवतापाविषयी प्रतिज्ञा करत. कीटकजन्य आजाराविषयी तोंडी माहिती देऊन जनजागृती करण्यात आली.सोबत ग्रामीण भागात हिवताप आजाराविषयी हस्तपत्रिका वाटप करण्यात आले.शाळेत जनजागृतीपर कार्यक्रम घेऊन हिवतापाविषयी प्रतिज्ञा घेण्यात आली.तसेच विद्यार्थांना प्रश्नोत्तरे स्वरूपात माहिती विचारण्यात आली.गावात कंटेनर सर्वेक्षण करण्यात आले.एक दिवस कोरडा दिवस पाळण्याविषयी नागरिकांना आवाहन करण्यात आले.रांगोळी स्पर्धा घेण्यात आली.हिवताप आणि इतर कीटकजन्य आजार होऊ नयेत त्या साठी काय काय खबरदारी घेण्यात यावी याविषयी माहिती देवून आरोग्य शिक्षण देण्यात आले.सदर कार्यक्रम ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ.मंदार करंबेळकर वैद्यकीय अधीक्षक वर्ग _१,डॉ.प्रशांत पाटील तालुका आरोग्य अधिकारी, डॉ.वैदेही पंडित वैद्यकीय अधिकारी श्रेणी १,डॉ.प्रमोद सोनवणे वैद्यकीय अधिकारी आणि सर्व वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडला. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडावा म्हणून विशेष मेहनत चाळीसगाव तालुक्यातील सर्व आरोग्य सेवक,सेविका,आरोग्य सहायक,आरोग्य सहायिया,औषध निर्माण अधिकारी,प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी व इतर सर्व कर्मचारी वृंद सोबत सर्व आशा ताई यांनी घेतली. कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य जिल्हा परिषद आरोग्य विभाग जळगाव, जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय जळगाव,ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव,तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय चाळीसगाव तसेच तालुक्यातील सर्व शाळा आणि नागरिक यांचे लाभले.सदर कार्यक्रमासाठी गावातील नागरिक,शाळेतील सर्व शिक्षकवृंद,विद्यार्थी आणि आरोग्य अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी वृंद हजर होते.
