अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)- नानासो. उत्तमराव पाटील आदिवासी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा देवळी शाळेतील इयत्ता बारावीतील विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत सुयश शाळेचा निकाल लागला शंभर टक्के.
शाळेतील विद्यार्थिनी कु.निता रेल्या वळवी ७३.५० टक्के गुण मिळवीत शाळेतून विज्ञान शाखेत प्रथम तसेच कु.आरती गरबड भिल्ल ७२.१७ टक्के गुण मिळवीत शाळेतून कला शाखेत प्रथम क्रमांक मिळवून यश संपादन केले.
शाळेतील सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब कैलासराव सूर्यवंशी, सचिव आदित्य सूर्यवंशी, संचालिका जयश्री सूर्यवंशी,माध्यमिक मुख्याध्यापक श्री.सतीश पाटील,प्राथमिक मुख्याध्यापक श्री.तुषार खैरनार शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
