अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
चाळीसगाव(प्रतिनिधी)- चाळीसगाव शहर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकपदी अमित मनेळ यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी आज मंगळवारी (दि. १ जुलै) रोजी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला.
अमित मनेळ हे यापूर्वी नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात निरीक्षक पदावर कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी गुन्हे शोध, कायदा व सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
त्यांच्या चाळीसगाव येथील नियुक्तीमुळे शहरात कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. स्थानिक नागरिक, व्यापारी संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून त्यांचे स्वागत करण्यात येत आहे.
