अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
चाळीसगाव(प्रतिनिधी)– चाळीसगाव नगरपरिषदेच्या वतीने आज, दिनांक १ जुलै २०२५ रोजी शहरात स्वच्छता गृह स्वच्छता मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. मुख्याधिकारी सौरभ जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आरोग्य निरीक्षक विजय जाधव यांच्या आदेशानुसार शहरातील सर्व व्यापारी कॉम्प्लेक्समधील स्वच्छता गृहांची साफसफाई करण्यात येणार आहे.
या मोहिमेची सुरुवात छत्रपती शिवाजी चौकाजवळील गायत्री कॉम्प्लेक्स येथून झाली असून, मुकादम पुरुषोत्तम जाधव यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह ही मोहीम हाती घेतली आहे.
शहरात तालुक्यातील अनेक भागांतून नागरिक खरेदीसाठी येतात. त्यांच्यासाठी सार्वजनिक स्वच्छता गृह स्वच्छ व वापरायोग्य राहावेत या हेतूने ही मोहीम राबवली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून दुर्लक्षित असलेल्या या स्वच्छता गृहांच्या साफसफाईमुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
नगरपरिषदेच्या या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत करत समाधान व्यक्त केले असून, अशाच प्रकारे नियमित स्वच्छता राखण्याची मागणी केली आहे.
गायत्री कॉम्प्लेक्स मधील महिलांची स्वच्छता गृह साफ सफाईची मागणी आणि तात्काळ स्वच्छता सुरू
सोनाली गुरव,जयश्री पाटील,प्रतिभा महाले,कविता देशमुख व जानवी पवार या महिला व्यावसायिक असून हे गायत्री कॉम्लेक्स मध्ये काही टेलर तर काही ब्युटी पार्लर चा व्यवसाय करतात यामुळे यांच्या कडे महिला येत असतात त्यांना होणारी गैर सोय टाळण्यासाठी त्यांनी नगरपालिका मुख्याधिकारी यांना स्वच्छता गृह स्वच्छते बाबत निदर्शनास आणून दिले आणि मुख्याधिकारी यांनी स्वच्छता निरीक्षकांच्या आणि स्वच्छता निरीक्षकांनी तत्काळ स्वच्छता मोहीम सुरू केली.
स्वच्छता गृह साफ सफाई झाल्यानंतर गायत्री कॉम्लेक्स मधील व्यापाऱ्यांनी मानले आभार
गायत्री कॉम्प्लेक्स मधील स्वच्छता गृह साफसफाई झाल्यानंतर कॉम्प्लेक्स मधील व्यापाऱ्यांनी मुख्याधिकारी सौरभ जोशी,स्वच्छता निरीक्षक विजय जाधव,मुकादम पुरुषोत्तम जाधव व कर्मचाऱ्यांचे आभार मानले यावेळी मुन्ना देशमुख,तात्या चरण सिंग,वाणी बाबा,श्याम इलेक्ट्रिकल चे मालक उपस्थिती होते.
