अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)- दिनांक ४ जुलै २०२५ रोजी शिवसेना महिला आघाडीच्या वतीने चाळीसगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी सौरभ जोशी यांना धुळे रोडवरील शिव पार्वती नगर व पोस्टल कॉलनी परिसरातील रस्त्यांवरील समस्यांबाबत निवेदन देण्यात आले.
सदर निवेदनामध्ये संबंधित परिसरात अपुरे व नादुरुस्त असलेले स्ट्रीट लाईट्स दुरुस्त करून नवीन स्ट्रीट लाईट बसविण्याची मागणी करण्यात आली आहे. या रस्त्यांवर बऱ्याच दिवसांपासून स्दिट्रीट लाईट नसल्याने अनेक छोटे-मोठे अपघात होत असून, संध्याकाळी शालेय विद्यार्थी,कॉलेजच्या विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना अंधारामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
यासोबतच ८० फुटी रोडवरील श्रीराम नगर भागातील मोठमोठे खड्डे बुजवण्याचीही मागणी यावेळी करण्यात आली.
या निवेदनप्रसंगी महिला आघाडी तालुकाप्रमुख सविता कुमावत, योगिता थोरात, कविता पाटील, कमलाताई रावते, अंजली मराठी, निर्मलाताई सोनवणे, ज्योती राठोड, कल्याताई माळी, सोनाली महाजन, ज्योती महाजन, सुधाताई पवार, रीना पगारे, पुनम शेंगदाणे, मीनाताई पाटील, किरण राजश्री महाजन आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
