अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)- शहरातील तहाजीब हायस्कूल येथील 1 मुख्याध्यापक व 8 शिक्षकांवर विविध कलमांखाली चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून,या प्रकरणातील शिक्षक २० टक्के शासन अनुदानीत असतांना १०० टक्के शासन अनुदान निर्णय झाल्याचे शासनाच्या आदेशाची खोटी प्रत सादर करुन १०० टक्के पगार बिले तयार करणारा तो शाळेचा संचालकांचा लाडका “शहजादा” कोण?
सध्या शहरात गाजत असलेले शिक्षक अनुदान प्रकरण हे अत्यंत गंभीर स्वरूपाचे असून या प्रकरणाची गंभीर दखल घेत गटशिक्षण अधिकारी आनंदा भोई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 8 शिक्षक 1 मुख्याध्यापकावर गुन्हा झाला आहे, या प्रकरणाची शहर पोलिस चौकशी करत असून सर्व आरोपी गुन्हा दाखल होताच पसार झाले आहे.ते पोलिस प्रशासनाच्या ताब्यात आल्यास सर्व समोर येईल,पण यामागे असणाऱ्या मुख्य सूत्रधाराचा तपास लागणे महत्वाचे आहे,या प्रकरणाचा मास्टर माईंड कोण? यात 20 टक्के अनुदानित शिक्षकांना 100% अनुदानित करण्याचे आमिष दाखवत आर्थिक व्यवहार करत खोट्या आदेशाची प्रत तयार करणारा “शहजादा” कोण आहे?
यावर संस्था चालकांनी पुढे येण्याची गरज असून,पुढे नयेता त्याला पाठीशी घालणे म्हणजे या “शहजाद्यास” संस्थेच्या संचालकांचा आशीर्वाद आहे का? या प्रकरणातील आरोपी मुख्याध्यापकांनी जळगाव शिक्षाधिकाऱ्यांकडे 21 एप्रिल ला कोणत्या फाईल ची व काय तक्रार दिली आहे? ती फाईल शाळेतून घेऊन जाणार संचालक कोण? अश्या अनेक प्रश्नावर शहरात कुजबूज सुरू असून शिक्षकांना शाळेतील दरवाज्यापासून शिक्षेच्या दारापर्यंत घेऊन जाणाऱ्या “शहजाद्याचा” शोध लागणे गरजेचे आहे,तसेच त्याला सहकार्य करणाऱ्या संचालकांची देखील चौकशी झाली पाहिजे अशी शहरात चर्चा सुरू आहे.
क्रमश:
