अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) – जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनानुसार पोलिस स्टेशन हद्दीत अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते.
शिक्षकांना शाळेच्या दारापासून शिक्षेच्या दारापर्यंत घेऊन जाणारा “शहजादा” कोण?
त्याअंतर्गत दिनांक २ ऑगस्ट २०२५ रोजी मेहूणबारे पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, उंबरखेड (ता. चाळीसगाव) येथे दोन इसम अवैध शस्त्रे बाळगून दहशत निर्माण करत आहेत. माहितीच्या आधारे तात्काळ कारवाई करत पोलिसांनी सुकलाल सुरेश सोनवणेजी किरण यशवंत सोनवणे,
दोघेही रा. उंबरखेड यांना भिका सिताराम गायकवाड यांच्या घरात विनापरवाना अवैधपणे धारदार लोखंडी तलवार व धारदार लोखंडी कुकरी बाळगताना अटक केली. पंचासमक्ष पंचनामा करून शस्त्र जप्त करण्यात आली आणि संबंधित दोघांविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1)(3), 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मेहूणबारे पोलीस स्टेशनकडून सुरू आहे.
ही कारवाई प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण दातरे यांच्या नेतृत्वाखाली पो.उ.नि. सुहास आव्हाड, पो.उ.नि. विकास शिरोळे, पोहेकॉ. मोहन सोनवणे, कुशल शिंपी, बाबासाहेब पगारे, विनोद बेलदार, भुषण बाविस्कर, ईश्वर देशमुख यांनी संयुक्तरित्या केली.
पोलीस विभागाने चाळीसगाव व परिसरातील युवकांना इशारा दिला आहे की, अवैध शस्त्रे बाळगून समाजात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी अशा बेकायदेशीर कृत्यांची माहिती मेहूणबारे पोलिस स्टेशन अथवा जळगाव नियंत्रण कक्षाला त्वरित कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
