अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)– शहरातील सिंगिंग हार्ट्स ग्रुप तर्फे दरवर्षी संगीत क्षेत्रातील दिग्गज गायकांचा जन्मदिन साजरा केला जातो. याच परंपरेनुसार, स्वर्गीय मुकेशजी आणि स्वर्गीय किशोर कुमार यांच्या जन्मदिनानिमित्त रविवार, दि. १० ऑगस्ट रोजी हॉटेल ग्रीन लीफ येथे ‘शाम किशोर कुमार, मुकेशजी के नाम’ हा भव्य संगीत कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात मुकेशजींची आणि दुसऱ्या सत्रात किशोर कुमार यांच्या अमर गाण्यांची रंगतदार मेजवानी सादर करण्यात आली. या कार्यक्रमाला हॉटेल ग्रीन लीफचे संचालक संदेशभाऊ येवले, सामाजिक कार्यकर्ते व संगीतप्रेमी प्रकाशभाऊ विसपूते यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच दैनिक ग्रामस्थचे संपादक किसनराव जोर्वेकर, हृदय तज्ज्ञ डॉ. सी.टी. पवार, नंदन डेअरीचे संचालक अनिल (राजूभाऊ) कोतकर, कन्हैया ज्वेलर्सचे संचालक श्री. कळवाडीकर आदी मान्यवरांसह महिला वर्गाचीही उपस्थिती लक्षणीय होती.
सिंगिंग हार्ट्स ग्रुपचे ज्येष्ठ सहकारी व पिंपरखेड विद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य राजाराम उगले यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. अध्यक्ष डॉ. संजय शेजवळकर यांनी दोन्ही महान गायकांच्या आठवणींना उजाळा देत कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढवली.
सोलो व ड्युएट गाण्यांमधून अॅडमिन व पदवीधर शिक्षिका अलका मोरे यांच्या सुमधूर आवाजासोबतच डॉ. संजय शेजवळकर, दैनिक बाजीरावचे संपादक सुनीलसिंह राजपूत, डॉ. प्रशांत ब्राम्हणकार, डॉ. पुष्कर घाटे, डॉ. संजय बाविस्कर, डॉ. शैलेंद्रसिंग पवार, सेवानिवृत्त पीएसआय राजेंद्र चित्ते, कौतिकजी गवारे, अभिजित भंडारी, राजाराम उगले आदींनी आपल्या सुरेल सादरीकरणाने प्रेक्षकांना तब्बल तीन तास मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाच्या अखेरीस उपस्थित संगीतप्रेमींनी सिंगिंग हार्ट्स ग्रुपच्या उपक्रमाचे कौतुक करत दाद दिली.
