अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) – गेल्या अनेक दिवसांपासून दाहक उकाड्याने हैराण झालेल्या चाळीसगाव शहरवासीयांना आज अखेर दिलासा मिळाला. आज रात्री 7 वाजता सुरू झालेल्या जोरदार पावसाने उष्णतेपासून सुटका करून दिली असून शहराच्या वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून आभाळ ढगाळ असले तरी पाऊस काही केल्या हजेरी लावत नव्हता.सतत वाढणारे तापमान, उकाडा आणि उष्म्याच्या झळा यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. पावसाळ्यातील पावसाने दांडी मारल्याने उकाड्याने घाम फोडला होता. मात्र,आज अचानक मुसळधार पावसाला सुरुवात होताच रस्त्यांवर पाणी साचले, तर नागरिकांनीही आनंदाने पावसाचे स्वागत केले.
पावसामुळे बाजारपेठ, मुख्य रस्ते, वसाहतींमध्ये काही ठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीला किरकोळ अडथळा निर्माण झाला. तरीही, उष्णतेपासून झालेला दिलासा अधिक महत्त्वाचा असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. “खूप दिवस उकाडा होता. आजच्या पावसामुळे घरात आणि बाहेरही गारवा जाणवतो आहे,” असे एका स्थानिक नागरिकाने सांगितले.
पावसाचा जोरदार हजेरी लावल्याने पाऊस पडण्यास पुन्हा सुरुवात झाली असून पुढे ही पाऊस सुरू राहिल अशी आशा निर्माण झाली आहे.त्यामुळे उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
