अधिकार आमचा न्युज नेटवर्क
जळगाव प्रतिनिधी शाहिद खान
भुसावळ(प्रतिनिधी)- शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. 158/2025 भादंवि कलम ३७९ अंतर्गत दाखल असलेल्या मोटारसायकल चोरी प्रकरणातील आरोपी हसन अली उर्फ आसु नियाजअली ईरानी (रा. पापा नगर, भुसावळ) याला भुसावळ पोलिसांनी अटक केली आहे.
आमदार मंगेश चव्हाण यांच्या वाढत्या लोकप्रियतेसह सुरू आहे शहराच्या विकासाचा प्रवास
सदर आरोपीवर शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मोटारसायकल चोरी करून फरार झाल्याचा गुन्हा दाखल होता. गुन्ह्याचा तपास करताना पोलीस अधीक्षक जळगाव महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी भुसावळ विभाग संदीप गावित व पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पाहिजे आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकातील पोलीस कर्मचारी प्रशांत सोनार यांना गुप्त बातमीदारामार्फत आरोपी सिटी हॉस्पीटलजवळ दिसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पो.हे.कॉ. विजय नेरकर, पो.कॉ. सचिन चौधरी, पो.कॉ. भुषण चौधरी, पो.कॉ. योगेश माळी, पो.कॉ. महेंद्रसिंग पाटील, पो.कॉ. हेमंत जांगळे, पो.कॉ. मनोज गालफडे, पो.कॉ. अक्षय कोतकर व पथकातील इतर सदस्यांनी तातडीने कारवाई करून आरोपीला पकडले.
पोलिसांना पाहून आरोपी पळण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र पथकाने पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पुढील कारवाईसाठी त्याला शनिपेठ पोलीस ठाण्यातील पो.हे.कॉ. प्रदीप रमेश नन्नवरे यांच्या ताब्यात देण्यात आले.
यानंतर शनिपेठ पोलिसांच्या सहकार्याने डी.बी. पथकाने चोरीस गेलेली मोटारसायकलही शोधून काढली आहे. मोटारसायकल शनिपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
