अधिकार आमचा न्युज नेटवर्क
जळगाव प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव (प्रतिनिधी)- शहरातील तांबापुरा येथील पंचशील नगर भागात घरफोडीची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अकिल शेख इनायत (वय 44, व्यवसाय-हमाली, रा. पंचशील नगर, जोहर चौक, तांबापुरा) यांनी एम आय डी सी पोलिसात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीच्या माहितीनुसार, दि. 16 ऑगस्ट रोजी रात्री 12.30 वाजता कुटुंबासह वरच्या मजल्यावर झोपायला गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 6.30 वाजता घरातील मागील हॉलमध्ये सामान अस्ताव्यस्त अवस्थेत दिसून आले. वस्तूंची पाहणी केल्यानंतर घरातील दोन मोठी पितळी हांडे, चार लहान पितळी तांबे, आठ पितळी ग्लास, दोन पितळी वाट्या, दोन जुनी पाण्याच्या मोटारी तसेच 17,200 रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल चोरीस गेल्याचे उघड झाले.
चोरी गेलेल्या मालाची किंमत सुमारे 20 हजार रुपयांच्या आसपास असल्याचे सांगण्यात येत आहे.अज्ञात चोराविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 305 (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास एम आय डी सी पोलिस ठाण्याचे पोलिस करीत आहेत.
