अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) – दिनांक 23 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 7 ते 8 वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात शहागंज, संभाजीनगर येथील सिकंदर खान शेर खान (वय 56) यांचा मृत्यू झाला.
मोदिजींच्या वाढदिवसानिमित्त चाळीसगावकरांना खास भेट : ‘नमो उद्यान’ उभारणीसाठी १ कोटी निधी मंजूर
मिळालेल्या माहितीनुसार, मृत इसम हे आपल्या ताब्यातील मोटारसायकल (क्रमांक MH 20 GS 9273) घेऊन चाळीसगाव वरून संभाजीनगरच्या दिशेने जात होते. दरम्यान घाट रोडवरील कन्नड घाटाच्या पायथ्याशी दस्तुरी फाटा येथे अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात ते दुचाकीसह रस्त्याच्या कडेला फेकले जाऊन गंभीर जखमी झाले होते.
घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार सुनील पाटील हे तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी 108 क्रमांकावर संपर्क साधून ॲम्बुलन्सच्या मदतीने गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या सिकंदर खान यांना चाळीसगाव शहरातील महात्मा ज्योतिबा फुले ट्रॉमा केअर सेंटर,ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये अपघाताचा गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार विकास चव्हाण करीत आहेत.
