अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)- दि. 16 नोव्हेंबर 2025 — चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पथकाने अवैध गावठी हातभट्टीविरोधात मोठी कारवाई करत तिघा आरोपींवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकात पोउनि कुणाल चव्हाण, राहुल राजपूत, स.फौ. युवराज नाईक, पोहवा नितीन सोनवणे, दिपक नरवाडे, गणेश चव्हाण, रवींद्र रावते, अक्रम बेग, पो.ना. भगवान माळी, पो.शी. विजय पाटील, ज्ञानेश्वर वाघ, बाळू बाविस्कर, संभाजी वाघ यांचा समावेश होता.

या पथकाने विविध ठिकाणी एकाच वेळी धाड टाकून आरोपींवर कारवाई केली यात १)आकाश मदन चव्हाण, रा. विसापूर तांडा २) हसन रामा सोनवणे, रा. चितेगाव ३). चिला भीमराव पवार, रा. पिंपरी बु. प्र. चा.कारवाईत मिळालेला अवैध मुद्देमाल—2,900 लिटर कच्चे रसायन 50 लिटर उकळते रसायन 85 लिटर तयार गावठी दारू एकूण रु. 1 लाख 11हजार 750 रुपये किमतीचे साहित्य ताब्यात घेण्यात आले. रासायनिक तपासणीसाठी नमुने घेतल्यानंतर उर्वरित सर्व सामग्री जागीच नष्ट करण्यात आली.या संदर्भात महाराष्ट्र मद्यनिषेध अधिनियमाच्या कलम 65(f) आणि 65(e) अंतर्गत तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनी नितीन पाटील यांनी सांगितले की, “अवैध दारू धंदे करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कठोर मोहीम राबवली जाणार असून कोणालाही कुठल्याही प्रकारची सूट दिली जाणार नाही.”
