अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) : शहरात नगरपालिका निवडणुकांच्या नामांकन प्रक्रियेला सुरुवात झालेल्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये मतदानाबाबत जागृती निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील गुड शेफर्ड अकॅडमी तर्फे नगरपालिका इमारत परिसरात आकर्षक आणि संदेशपूर्ण रांगोळी तयार करण्यात आली.
भारतीय तिरंग्याच्या स्वरूपात साकारलेली ही रांगोळी धार्मिक सौहार्द, राष्ट्रीय एकता आणि मतदानाचे महत्व अधोरेखित करते. विविध धर्मांचे चिन्ह, मतदान पेटीत टाकलेला मताचा हक्क आणि “मतदान करा – हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे” असा संदेश देत या रांगोळीने परिसरात येणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष वेधून घेतले.
नागरिकांनी आपल्या लोकशाही हक्काचा सक्रीय वापर करून मोठ्या संख्येने मतदान करावे, यासाठी शाळेच्या विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि शिक्षकांनी हा उपक्रम राबवला. नगरपालिका आवारात झालेली ही आगळीवेगळी जनजागृती सर्वत्र कौतुकास्पद ठरत आहे.
