अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
यांच्यात होणार नगराध्यक्ष पदाची लढत
देशमुख पद्मजाताई राजीव( मा.लोकनेते अनिल दादा देशमुख शहर विकास आघाडी),चव्हाण प्रतिभाताई मंगेश(भारतीय जनता पार्टी),जाधव राहुल भीमराव(आम आदमी पार्टी),पाटील समाधान भीमराव(राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट)
चाळीसगांव(प्रतिनिधी)- दिनांक: २१ नोहेंबर २०२५
चाळीसगांव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी दाखल करण्यात आलेल्या नामनिर्देशन अर्जांची माघारी प्रक्रिया आज संपली असून, गेल्या दोन दिवसांत नगराध्यक्ष पदासह विविध प्रभागांमधून एकूण ८३ वैध उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी प्रमाद हिले यांनी नमुना ६ नियम ९(२) नुसार प्रसिद्ध केलेल्या सूचनेनुसार, २० नोव्हेंबर २०२५ आणि २१ नोव्हेंबर २०२५ या दोन्ही दिवशी माघारी झाल्या आहेत.
नगराध्यक्ष पदासाठी माघार:
देशमुख अभिषेक राजीव यांनी २१ नोव्हेंबर २०२५ रोजी आपला नगराध्यक्ष पदासाठी असलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे,मात्र ते प्रभाग क्रमांक १६(अ) मधून नगरसेवक पदासाठी लढणार आहे तसेच नगराध्यक्ष पदासाठी त्यांच्या मातोश्री पद्मजाताई राजीव देशमुख या लढणार आहेत.
प्रभागातील माघारीचे दोन दिवसांतील चित्र:
माघार घेतल्या काही उमेदवारांची नावे
नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया दोन दिवसांत झाली असून, २० नोव्हेंबर २०२५ रोजी प्रामुख्याने काही उमेदवारांनी माघार घेतली. यामध्ये प्रभाग क्र. ०१ अ मधून पाटील सौरभ अनिल,प्रभाग क्र. ०६ अ मधून पाटील गिता महेंद्रसिंग, आणि प्रभाग क्र. ०९ ब मधून अहिरे धम्मपाल राजेंद्र यांचा समावेश आहे. प्रभाग क्र. ०४ अ आणि ०४ ब या दोन्ही प्रभागातून बोरसे स्मितल दिनेश यांनीही २० नोव्हेंबर रोजी माघार घेतली.
त्यानंतर, २१ नोव्हेंबर २०२५ रोजी देखील काही उमेदवारांनी माघार घेतली, ज्यामुळे निवडणुकीच्या रिंगणातील चित्र अधिक स्पष्ट झाले. यामध्ये प्रभाग क्र. ०१ अ मधून पाटील राहुल साहेबराव,प्रभाग क्र. ०१ ब मधून पाटील कल्पना हिरामण आणि गोत्रे नंदा विलास, प्रभाग क्र. ०२ अ मधून म्हस्के आशाबाई विठ्ठल आणि पोळ आकाश शंकर,प्रभाग क्र. ०३ ब मधून सर्वाधिक म्हणजे भामरे वैशाली नितिन, पाटील स्मिता दिपक, बोरसे अलका भिमराव, आणि जाधव शारदा रविंद्र या चार उमेदवारांनी माघार घेतल्याने या प्रभागातील लढत कमी झाली आहे. प्रभाग क्र. ०४ अ मधून महालपुरे कल्पेश सुनिल, सोनवणे अनिता संदीप, आणि मोरे दिनेश भिमराव या तिघांनी अर्ज मागे घेतले. प्रभाग क्र. ०५ अ मधून चौधरी रुपाली मनोहर आणि चौधरी शुभांगी गोकूळ यांनी माघार घेतली तसेच इतर देखील काही उमेदवारांनी माघार घेतली असून एकूण ८३ वैध उमेदवारांनी माघार घेतल्याचे स्पष्ट झाले आहे यामुळे आता ११९ उमेदवार चाळीसगाव नगरपालिका निवडणूक रिंगणात आहेत
निवडणुक प्रचाराला येणार वेग
एकूण ८३ उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे, चाळीसगांव नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आता प्रमुख लढत मा लोकनेते अनिलदादा देशमुख शहर विकास आघाडी व भारतीय जनता पार्टीत होणार आहे,तसेच काही ठिकाणी अपक्ष असलेल्या उमेदवारांची देखील लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.अर्ज माघारीचा हा टप्पा पूर्ण झाल्याने,आता निवडणुकीच्या प्रचाराला अधिक वेग येणार आहे.
