अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार मलिक
नवी दिल्ली-अमरनाथ गुफे खाली ढगफुटी झाल्याने 10 भाविकांचा मृत्यू झाला आहे,तर अनेकांचा शोध सुरू आज साध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास ढगफुटी झाल्याने 10 भाविकांचा मृत्य झाल्याची घटना घडली असून अनेक भाविकांचा शोध सुरू आहे,एनडीआरएफ चे डिजी अतुल करवाल यांनी सांगितले की बर आहे, पाण्याची पातळी कमी होत आहे, मात्र आम्ही प्रत्येक परिस्थिती साठी तयार आहोत, एनडीआरएफ जवानांची एक टीम नेहमी गुफे जवळ असते ती टीम त्वरित बचावकार्यात सहभागी झाली होती,सोबतच जवळ असलेल्या दोन टीम ने सुद्धा तेथे पोहचून बचावकार्य करण्यास सुरवात केली होती,एनडीआरएफ,एसडीआरएफ आणि अन्य संस्था बचावकार्यत सहभागी झाल्या आहेत,मिळालेल्या माहिती नुसार आता पर्यंत 10 लोकांचा मृत्यू झाला असून अनेक लोकांना वाचविण्याचे प्रयत्न जवानांकडून सुरू आहे,जम्मू काश्मीर पोलिसांच्या म्हणण्यानुसार ढगफुटी मुळे तंबू अचानक पुराच्या पाण्याखाली आले,दरम्यान, ढगफुटी झालेल्या भागामध्ये अनेक भाविक अडकले असून बचावकार्य सुरु आहे. या यात्रेला 30 जूनपासून सुरुवात झाली आहे. पवित्र अमरनाथ गुहेपासून दोन किलोमीटरवर ही ढगफुटी झाली आहे.