कट केलेल्या मीटरची जोडणी करण्यासाठी लागले तब्बल 4 महिने 2 दिवस महावितरण कर्मचाऱ्यांची कमाल,ग्राहकाचे हाल

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)-दि 26 फेब्रुवारी 2021 रोजी दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी थकीत बाकी न भरल्याने वीज कनेक्शन तोडण्यात आले व त्याच दवशी दुपारी 1 वाजेच्या सुमारास संपूर्ण थकीत बिल सह वीज जोडणीची 236 रुपयांची रक्कम देत वीज जोडणी करण्याची ग्राहकाने विनंती केली मात्र वीज जोडणीसाठी लागले तब्बल 4 महिने 2 दिवस महावितरणाच्या कर्मचाऱ्यांची कमाल,मात्र ग्राहकाचे हाल असेच काही शहरात झाले आहे
चाळीसगाव शहरातील कॅप्टन कॉर्नर भडगाव रोड जवळील परिसरात गणेश अग्रवाल महावितरण ग्राहकाचे मीटर क्रमांक 119760252163 या मीटरची थकबाकी असल्यामुळे महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी घरी जाऊन दि 26 फेब्रुवारी 2021 ला मीटर कनेक्शन अग्रवाल घरी नसतांना व पूर्व सूचना न देता कट केले व लगेच दुपारी 1 वाजेच्या सुमारास अग्रवाल यांनी संपूर्ण थकबाकी भरत कनेक्शन जोडणी साठी अतिरिक्त रक्कम 236 रुपये भरली मात्र वीज कनेक्शन जोडणी साठी अग्रवाल यांना तब्बल 4 महिने 2 दिवस वाट पाहावी लागली
आज शेवटी सकाळी 11 वाजून 17 मिनिटांनी शिंगणे साहेबांना फोन केला असता लेखी तक्रार दाखल करा म पाहू असे उत्तर मिळाले संपूर्ण प्रकार ऐकून कारवाई करण्याची अपेक्षा असतांना असे अनपेक्षित उत्तर मिळाले मात्र 11 वाजून 32 मिनिटांनी महावितरण कर्मचाऱ्यांनी वीज कनेक्शन जोडणी केली
वारंवार कर्मचाऱ्यांना फोन केला असता फोन न उचलणे,फोन उचलला तर उडवाउडवीची मिळाली मात्र शिंगणे साहेबांना फोन करताच जादू झाल्यासारखे काही मिनिटांमध्ये वीज कनेक्शन पुन्हा जोडण्यात आले मात्र 4 महिने 2 दिवस जर जागृत ग्राहकाला त्रास होत असेल तर सामान्यांचे काय? याकडे अधिकारींनी लक्ष देणे गरजेचे आहे
जर थकबाकी साठी सर्व महावीतरणाची सर्व यंत्रणा कामी लागते तर ग्राहकांच्या सेवेपासून लांब का? वीज जोडणी झाली की नाही याचा जाब विचारण्याची जबाबदारी कोणाची? ग्राहकांना नाहक त्रास होत असेल तर अधिकाऱ्यांचे कर्तव्य काय? वीज कनेक्शन तोडणी पूर्वी ग्राहकांना पूर्व सूचना देण्याचे कर्तव्य आहे की नाही ? असे अनेक अनुत्तरित प्रश्न ग्राहकांच्या समोर उभे आहेत अशे किती प्रकरण महावीतरणाच्या कार्यालयात धूळ खात पडले असतील? अग्रवाल जागृत ग्राहक असल्यामुळे हा प्रकार समोर आला आहे मात्र एक गोष्ट नक्की आहे ग्राहकांचे सेवक मालक म्हणून महावीतरणाच्या खुर्चीवर बसून ग्राहकांना होणाऱ्या त्रासाचा खेळ बघत आहे या प्रकरणात महावितरण अधिकारी आपली जबाबदारी कशी पार पाडतील काय कारवाई होईल या कडे मात्र ग्राहकांचे लक्ष लागून आहे.