oplus_2097154
अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)-दिनांक 11 जुलै शनिवार रोजी रात्री मेहुंबऱ्याजवळ दरेगाव फाट्यावर मागून येत ओव्हरटेक करून पुढे जाणाऱ्या आयशर ट्रक ने अचानक वळण घेतला यामुळे मागेच असलेल्या बसचा अपघात झाल्याची गंभीर घटना घडली आहे.
नंदुरबारहून छत्रपती संभाजीनगरकडे निघालेल्या एमएच १५ जेडब्ल्यू २४८३ क्रमांकाच्या एसटी बसचा दसेगाव फाट्याजवळ शनिवारी मध्यरात्री ११.४० वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. मागून भरधाव वेगाने आलेल्या आयशर वाहनाने ओव्हरटेक करून अचानक जोरदार वळण घेतल्याने हा अपघात घडला.
या प्रकरणी एसटी बस चालक शरद आनंदा साबळे (रा. ऐचाळे, ता. साक्री) यांनी मेहुणबारे पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, अपघात घडवून घटनास्थळावरून पसार झालेल्या आयशर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, आयशर चालकाने निष्काळजीपणे व भरधाव वेगाने वाहन चालवत एसटी बसला धडक दिली. अपघातात एसटी बसचे नुकसान झाले. सुदैवाने या अपघातात चालक,वाहक व प्रवाश्यांना कोणतीही हानी झाली नाही.या प्रकरणाचा पुढील तपास मेहुणबारे पोलीस करीत असून, फरार आयशर चालकाचा शोध सुरू आहे.
