वार्डात रस्त्यांची दुरावस्था न पा प्रशासनास वारंवार सांगून काम होत नसल्याने कार्यकाळ संपलेल्या नगरसेवकाचा आत्मदहनाचा इशारा

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगांव(प्रतिनिधी)-वार्डात भुयारी गटारींच्या कामामुळे झाली रस्त्यांची दुरवस्था वारंवार सांगून सुद्धा काम होत नसल्याने कार्यकाळ संपलेल्या नगरपालिका प्रशासनास पत्र देत रोजी नगरसेवकाचा आत्मदहनाचा इशारा.
दि 20 रोजी वार्ड क्रमांक 10 चे कार्यकाळ संपलेले नगरसेवक चंद्रकांत तायडे यांनी नगरपालिका प्रशासनास दिलेल्या पत्रात , मी मुख्याधिकारी साहेब यांना 27 जून 2022 रोजी व सोबत जिल्हाधिकारी साहेब यांना देखील अर्जाच्या माध्यमातून व तसेच भुयारी गटारीचे ठेकेदार जैनसाहेब व नगरपालिकेचे सांगवी , दीपक देशमुख ,बांधकाम विभागाचे प्रदीप धनके ,भूषण लाठे या सर्वाना मी माझ्या प्रभागातील भुयारी गटारींच्या कामामुळे सर्वच रस्ते खराब झाले असून रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत सतत फोन करत पाठपुरावा केला. भुयारी गटारीच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये स्पष्ट लिहिले आहे कि , भुयारी गटारींचे कामे झाल्यावर खराब झालेले रस्ते जर कच्चे असतील तर खडी मुरूम टाकावे , डांबरी रस्ते असतील तर डांबरी रस्ते करावे , सिमेंटचे रस्ते असतील तर सिमेंटचे रस्ते करावे असे नमूद केलेले असताना व या सर्वांची तक्रार मी नगरपालिका प्रशासनातील अधिकारी वर्गांना सतत वारंवार केली मात्र तक्रारीची दखल कोणीच घेतलेली नाही मात्र पुढील येणाऱ्या ५ दिवसात जर रस्ते खडी – मुरूम टाकून व्यवस्थित केले नाहीत तर मला नाईलाजास्तव आत्मदहन करावे लागेल व माझ्या परिवाराची जबाबदारी आपली राहील अशी चेतावनी व याचे सर्व जबाबदार आपण सर्व अधिकारी वर्ग असाल असे म्हटले आहे.मात्र जर कार्यकाळ संपलेल्या माजी नगरसेवकास आपल्या वार्डात काम व्हावे या मागणी साठी आत्मदहनाचा इशारा द्यावा लागतो तर संपूर्ण शहरातील वार्डात रस्ते खराब झाले असून सामान्यांचे काय सामान्यांचा वाली कोण? असा संतप्त सवाल उभा राहतो नगरपालिका प्रशासनाने ठेकेदाराकडून शासन नियमांनुसार काम करून घ्यायला हवे मात्र नेमकं काय सुरू आहे,हे स्पष्ट व्हायला हवे.