Oplus_16908288
अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)-चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याबाहेर आयोजित आंदोलनादरम्यान पोलिस प्रशासनाविषयी कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी माजी खासदार उन्मेष पाटील यांच्याविरोधात अदखलपात्र (एन.सी.) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहितीनुसार, २७ जून रोजी शहर पोलिस ठाण्याच्या आवारात झालेल्या धरणे आंदोलनात भाषण करताना उन्मेष पाटील यांनी चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले यांच्याविषयी उद्देशून कथितरीत्या खालच्या पातळीवरील व आक्षेपार्ह शब्दांचा वापर केल्याचा आरोप आहे.तसेच उपस्थित जनतेसमोर पोलिसांची बदनामी केल्याची तक्रारही करण्यात आली आहे.
या प्रकरणी गोपनीय शाखेचे पोलीस अंमलदार योगेश बेलदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३५२ व ३५६(२) अन्वये अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
या घटनेमुळे चाळीसगावच्या राजकीय तसेच पोलीस वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया नियमानुसार राबविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
