अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) – आज दिनांक 08 ऑक्टोबर 2025 रोजी पहाटेच्या सुमारास चाळीसगाव-खडकी बायपासच्या पुढे झालेल्या अपघातात ट्रक चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
यशवंत सिंह राजपूत (वय 50, रा. राजस्थान) हे आपल्या ताब्यातील ट्रक आर जे 36 जी ए 7055 चे ब्रेक तपासत असताना त्यांचा ट्रक अचानक मागे आल्याने ते ट्रकच्या खाली सापडल्यामुळे त्यांना या अपघातात गंभीर दुखापत झाली.अशी माहिती त्याच्यासोबत असलेले सहाय्यक ड्रायव्हर बाळू यादव यांनी ग्रामीण पोलिसांना सांगितली.
जखमी अवस्थेत असलेल्या यशवंत सिंग यांना त्यांचे सहकारी बाळू यादव यांनी चाळीसगाव येथील महात्मा फुले ट्रॉमा केअर सेंटर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
सदर घटनेचा अधिक तपास ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी करीत आहे.
