अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)- शहरात कोट्यवधी रुपये खर्च करून तयार झालेली प्रशासकीय इमारत सामन्यांना केंद्रस्थानी ठेवत आमदार मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आली आहे.या मुळे सामान्यांची विविध कार्यालयात होणारी पायपीट जरी थांबली असली तरी पूर्वी असलेला त्रास कायम असल्याचे दिसत आहे.
एवढ्या भल्या मोठ्या प्रशासकीय इमारतीत आमदार साहेबांनी सामान्य नागरिकांना होणारी पायपीट थांबिण्यासाठी ८ कार्यालय एका ठिकाणी आणले याचे कौतुक झालेच पाहिजे मात्र या भव्य इमारतींच्या कार्यालयात रेशन कार्डाच्या विविध प्रकारच्या कामांसाठी तालुक्यातून येणाऱ्या सामान्य नागरिकांना पूर्वी सारखेच इमारती बाहेरील खिडकीत लाईनीत उभे राहून काम करून घ्यावे लागत आहे.आता पावसाळा सुरू असून पावसापासून तर उन्हाळ्यात ऊनापासून एवढी प्रशासकीय इमारतीची छत जर सामान्य नागरिकांच्या डोक्याचे छत्र होत नसेल तर हे व्यवस्थापन पाहता खरच ही इमारत सामन्यांच्या हितासाठी बांधली गेली आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो.आज देखील या इमारतीच्या आत सामान्य नागरिकांसाठी व्यवस्था करता येऊ शकते इतकी जागा आहे.पण याकडे कोणाचेही लक्ष नसल्याचे दिसून येत आहे.याकडे लक्ष देण्याची गरज असून ही समस्या मार्गी लागली पाहिजे.
सामान्य नागरिकांच्या हिताचे कार्य झाले आहे हे खरे आहे मात्र सामान्य नागरिकांचे हित जपले गेले पाहिजे नाहीतर पायपीट जरी थांबली तरी वर्षानुवर्ष सुरू असलेला त्रास आजपण कायम राहणार असेल तर सामान्य हिताचे प्रयत्न निष्फळ झाल्या सारखेच आहे.
