उपळाई बुद्रूक (सोलापुर) : पुन्हा वर्दीतील माणुसकी चे दर्शन पावसाळ्यात झालेली अतिवृष्टी,अवकाळी पाऊस या मुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे.शेतकऱयांच्या तोंडातील घास गेला आहे. पीकलेली पिके वाया गेली आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडुन शेतकर्यांना कर्जमाफीची अपेक्षा आहे. कर्ज माफी साठी सरकार पुढे आल आहे पण सरकारला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे लक्षात घेऊन माढ्यातील एका पोलिस कर्मचार्यांने शेतकर्यांना कर्जमाफी व्हावी, यासाठी आपला एक महिनाचा पगार देवु केला असुन याबाबतचे पत्र व ४४हजार १०० रुपयाचा धनादेश त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवला आहे. माढा पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रमेश तुकाराम मांदे असे या शेतकर्याप्रती संवदेनशील पोलिसांचे नाव आहे.
