संत शिरोमणी गुरू रविदास महाराज यांची ६४५ वी जयंतीनिमित्त चाळीसगांवात प्रतिमा पुजन
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार मलिक
चाळीसगांव- आज संत शिरोमणी गुरू रविदास महाराज यांच्या ६४५ व्या जयंतीनिमित्त देवी वाडा घाट रोड चाळीसगाव येथे प्रतिमा पुजन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी चर्मकार उठाव संघाचे प्रदेश अध्यक्ष मोतीलाल अहिरे यांनी आपल्या मनोगतातून आजच्या कार्पोरेट युगात आरक्षणाच्या भरवशावर राहू नका हाताला काम,कामाला दाम कसा मिळेल यातून आपल्याला आर्थिक उन्नत कसे होता येईल यासाठी प्रयत्न करा.नोकऱ्या मिळतीलचं असे नाही स्वयं रोजगाराकडे वळा म्हणजे तुमची आर्थिक प्रगती होईल असे प्रतिपादन चर्मकार उठाव संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मोतीलाल अहिरे यांनी केले.
तसेच सामाजिक कार्यकर्ते युवराज जाधव मन चंगा तो कठौती में गंगा हे ब्रीदवाक्याचा बोध घेऊन कशी चालना देता येईल असे समाजाला सांगितले व समाजसेवक विजय चौधरी यांनी संत रोहिदास महाराज यांच्या जीवन चरित्र आला उजाळा दिला तसेच सूत्रसंचालन प्रवीण जाधव यांनी केले तर आभार आनंद गांगुर्डे यांनी मानले,
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी गांगुर्डे,ज्येष्ठ सल्लागार पोपट गांगुर्डे, चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष मोतीलाल आहिरे,नगरसेवक बापु अहिरे, समाजसेवक युवराज जाधव सामाजिक कार्यकर्ते विजय चौधरी, चर्मकार उठाव संघ व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष देवेंद्र गांगुर्डे, माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी,चिंधा सोनवणे, प्रवीण जाधव,सागर चौधरी, किरण मोरे,खुशाल मोरे,श्रीकृष्ण वाघ,योगेश वाघ,सागर गांगुर्डे,संजय वानखेडे,निंबा चौधरी,राजेंद्र गांगुर्डे,मंगेश गांगुर्डे,विष्णु जाधव,ज्ञानेश्वर गांगुर्डे,अरविंद वाघ,अशोक जाधव,शेखर जाधव,भारत अहिरे,अनिल गांगुर्डे,शिवदास गांगुर्डे, गणेश शार्दुल,निलेश राजपूत,विरल गुजर,पवन गांगुर्डे, शाम जाधव,शुभम जाधव,अमर चौधरी,शुभम अहिरे, समाजातील सर्व बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.