अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड(प्रतिनिधी)-अरविंद ज्ञानेश्वर देवकर या शिक्षकाच्या आत्महत्येची गुप्तचर यंत्रणेमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली आहे .याबाबत आमच्या प्रतिनिधीशी सविस्तरपणे बोलताना गौतम कांबळे म्हणाले की , अरविंद ज्ञानेश्वर देवकर उपशिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा होलेवस्ती ( जावजीबुवाचीवाडी जवळ )तालुका दौंड जिल्हा पुणे .जिल्हा परिषद पुणे
येथील शिक्षकाने तणनाशक औषध पिऊन आत्महत्या केली आहे .ही घटना शालेय शिक्षण विभागाच्या कारभाराला काळींबा फासणारी आहे .
अरविंद देवकर यांनी मृत्यूपूर्व चिठ्ठीत लिहिलेल्या सर्व बाबींची सखोल चौकशी करण्यात यावी .शालेय शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या भौतिक सुविधा न पुरवणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा .तसेच इतर काही लोकांनी वेगळा हेतू मनात ठेवून या शिक्षकाला मानसिक व शारीरिक त्रास दिला असल्यास याचीही सखोल चौकशी करण्यात यावी व दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे .या निवेदनाची प्रत स्थानिक आमदार राहुल दादा कुल यांना देण्यात आली आहे.