अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड-दिनांक 26 ऑक्टोंबर 2020 रोजी कालिदास ईश्वर ताकवणे याने फरसान खाण्याच्या बहाण्याने अल्पवयीन इयत्ता 6 वी मधील विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केला आहे. याबाबत मुलीची आजी यांनी यवत पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिल्याने भा द वि 376 व पोस्को ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री कापुरे यांनी आरोपीस तात्काळ अटक केली आहे.आज या घटनेची माहिती नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस चे पश्चिम महाराष्ट्र सचिव दादा जाधव यांना मिळताच त्यांनी एन.डी.एम.जे संघटनेचे राज्य सचिव वैभव तानाजी गिते यांना सर्व हकीकत सांगितली घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्य सचिव वैभव गिते पश्चिम महाराष्ट्र सचिव दादासाहेब जाधव. एम.डी. एम. जे ( पुणे जिल्हा निरिक्षक )पांडुरंग गडेकर,प्रकाश पारदासानी. यशवंत वाघोले अमर जोगदंड. गावचे ग्रा प सदस्य ज्ञानेश्वर सांबळे .पोलिस मित्र रमेशजी चितारे उपस्थित होते.