Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

अवैध वाळू उपसा व वाहतूक करणारे ४ ट्रक्टर, २ जेसीबी, १ डंपर एकूण ८३ लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त

0 0
Read Time4 Minute, 10 Second

संपादक गफ्फार शेख(मलिक)

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

भडगाव(प्रतिनिधी)-अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत चाळीसगाव उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधिक्षक, अभयसिंह देशमुख यांनी कारवाई करत वाळूने भरलेले ४ ट्रक्टर, २ जेसीबी, १ डंपर सह आरोपींना घेतले ताब्यात.
चाळीसगाव उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधिक्षक, अभयसिंह देशमुख यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की, भडगांव पोलीस स्टेशन हद्दीत वडधे गावाजवळ गिरणा नदी पात्रात काही लोक बेकायदेशीररित्या जेसीबी च्या सहाय्याने अवैध वाळु डंपर तसेच ट्रक्टर भरुन वाळु चोरी करुन तीची वाहतुक करत आहेत. तरी सदर ठिकाणी कायदेशीर कार्यवाही करणेकामी एक पथक तयार करुन सदर ठिकाणी गेले असता गिरणा नदी पात्रात एका जेसीबीच्या सहाय्याने ट्रक्टर भरतांना दिसले व एक जेसीबी नदी काठावर साठा करुन ठेवलेली वाळु डंपर मध्ये भरतांना दिसला तेव्हा खात्री होताच दिनांक १० जुलै २०२३ रोजी रात्री ११.५० वाजता छापा टाकला त्या ठिकाणी वाळूने भरलेले ४ ट्रक्टर, २ जेसीबी, १ डंपर व आरोपी १) परमेश्वर उदयसिंग राजपुत वय ४२ रा. महिंदळे, २) प्रदिप भाऊसाहेब पाटील- वय ३४, रा वडधे, ३) ज्ञानेश्वर मंगा सोनवणे वय २७ रा कोटली, ४) राहुल केशव महाजन वय २७ असे मिळून आले त्यांना विचारपुस केली असता त्यांनी आम्ही लखीचंद प्रकाश पाटील रा वडधे याचे सांगणेवरुन वाळु चोरी करत आहोत. असे सांगीतल्याने सदर इसमांना व वाहनाना ताब्यात घेवुन त्यांचे विरुद्ध पोना भगवान रामचंद्र पाटील यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन भडगांव पोलीस स्टेशनला गु.र.नं २०६/२०२३ भादवि कलम ३७९, १०९, ३४ व खान व खनिज अधिनियम १९५७ चे कलम २१ (१), २१ ( २ ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कार्यवाहीत एकुण ८३ लाख २४ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर पथकात १) सपोनि सागर ढिकले, २) पोना राजेंद्र अजबराव निकम, ३) पोकॉ / महेश अरविंद बागुल, ४) पोकों / विश्वास सुधाकर देवरे, ५) पोका श्रीराम विठ्ठल कांगणे, ६) पोकॉ राहुल राजेंद्र महाजन, ७) पोकॉ समाधान पोपट पाटील, ८) पोकॉ आशुतोष रमेश सोनवणे, ९) पोको रविंद्र निंबा वच्छे १०) पोकॉ नंदकिशोर शिवराम महाजन,११) पोकॉ पवन कृष्णा पाटील, १२) पोका विकास भिमराव पाटील, १३) पोना भगवान पाटील असे अधिकारी व अमलदार सहभागी असुन सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक जळगाव श्री. एम. राजकुमार साहेब, अपर पोलीस अधिक्षक चाळीसगाव श्री. रमेश चोपडे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
यापुढे देखील अशा प्रकारची अवैध वाळु चोरी विरुध्द धडक कार्यवाही करण्यात येणार असल्याचा मानस श्री. अभयसिंह देशमुख साहेब यांनी व्यक्त केला आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top
error: Content is protected !!
%d bloggers like this: