…आणि,दौंड तहसील कार्यालय झाले अनाथ!

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
तालुका प्रतिनिधी -योगिता रसाळ.
दौंड(प्रतिनिधी):दि.१४ एप्रिल २०२३ रोजी महसूल खात्याने उपविभागीय अधिकाऱ्यांच्या बरोबर, तहसीलदारांच्याही बदल्या केल्या. यामध्ये पुणे विभागाच्या ३२ तहसीलदारांच्या बदल्या होत्या, त्यात पुणे जिल्ह्यातील १३ तहसीलदारांचा समावेश आहे. यामध्ये बऱ्याच मातब्बगर तहसीलदारांच्या पुणे विभागाच्या बाहेर बदल्या करण्यात आल्या आहेत.
दिनांक- १४ एप्रिल २०२३ रोजी तहसीलदारांच्या बदल्या करण्यात आल्या परंतु, आज दिनांक १५ मे २०२३ पूर्ण एक महिना झाला असून देखील दौंडच्या तहसीलदारपदी अद्याप पर्यंत कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही. तहसीलदार पदी अद्याप पर्यंत कोणीही नियुक्त नसल्यामुळे दौंड तहसील मध्ये सध्या कार्यरत असणारे अधिकाऱ्यांचे मनमानी कारभार चालू आहे.कोणत्याही अधिकारी व कर्मचारी यांचा आपापसात ताळमेळ नसल्या कारणाने दौंडच्या तहसील कचरीमध्ये आणा गोंदी कारभार चालू आहे.
या सर्व गोष्टींचा दैनंदिन कामकाजावर गंभीर परिणाम झाला असून,या परिस्थितीत नागरिक पुरते हैराण वैतागलेले आहेत.
दौंड तहसील कचेरीला लवकरात लवकर तहसीलदार मिळावे,अशी मागणी वारंवार नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे एकंदरीत दौंड तहसील कचेरी अनाथ झाल्याचे चित्र तयार झाले,असून नागरिकांमध्ये हा चर्चेचा विषय बनलेला आहे.