आदेशाचे पालन न करणाऱ्या 2 वाहन चालकांना प्रत्येकी 2000 चा दंड कडक कारवाई ला सुरुवात
दौंड(पवन साळवे):-आज दि 9 एप्रिल रोजी आजपर्यंत विनाकारण संचारबंदी आदेश मोडून मोटारसायकलवर फिरणे याबद्दल 188 प्रमाणे गुन्हे दाखल होते परंतु माननीय जिल्हाधिकारी पुणे यांनी काल आदेश काढलेला आहे की कुणीही इसम तोंडाला मास्क न बांधता फिरताना मिळाल्यास त्याच्यावर भादवि कलम 188 प्रमाणे कारवाई होणार आहे तरी यापुढे कोणताही इसम मग तो अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणारा असेल किंवा शासकीय कर्मचारी असेल त्याच्याजवळ जर मास्क नसेल तर त्याच्यावर कारवाई ही निश्चितपणे होणार आहे म्हणून विनाकारण घराबाहेर पडू नका मास्कचा वापर करा आणि आपला देश वाचवा सर्वांनी या माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन करावे तसे दौंड पोलीस ठाण्याकडून आज पर्यंत 22 लोकांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत .व दोन वाहनचालकांना प्रत्येकी 2000 रु दंड देण्यात आला, पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या आदेशानुसार पोलीस हवालदार शिंदे यांनी आचारसंहितेच्या गुन्ह्याखाली आय पी सी 188 व 269 प्रमाणे आरोपींना प्रत्येकी दोन हजार रुपये प्रमाणे दंड ठोठावला आहे. सदरचे गुन्हे दाखल करीत असताना पोलीस कर्मचारी हे साध्या वेशामध्ये गावांमध्ये फिरून जे लोक विनाकारण बाहेर पडलेले आहेत अशा लोकांचे फोटो काढून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. व संचारबंदी आदेशाचा भंग करून जे लोक रस्त्यावर विनाकारण मोटारसायकली घेऊन फिरत होते त्यांच्यावर पोलिस भादवि कलम 188 व करुणा रोगास प्रसार करण्यासाठी निष्काळजीपणा केला म्हणून कलम 269 प्रमाणे कोर्टात केसेस सादर करत आहे माननीय न्यायाधीश जाधव साहेब यांनी आज दोन केसेस मध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये दंड केलेला आहे याची नोंद कायमस्वरूपी पोलिस दप्तरी राहणार आहे तरी कुणीही विनाकारण रस्त्यावर फिरू नका संचारबंदी आदेश मोडू नका व आपले गुन्हेगारी रेकॉर्ड बनवून घेऊ नका
उद्यापासून साध्या वेषातील पोलिसांची संख्या आणखी वाढविण्यात येणार असून ड्रोन च्या साह्याने ही निगराणी करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या लोकांच्या विरोधात गुन्हे दाखल होतील त्यांना समजणारही नाही तिथे कोण येऊन त्यांचा फोटो काढून गेलेले आहेत.
त्यामुळे स्वयंशिस्त पाळावी आणि विनाकारण बाहेर फिरू नये आणि आपले वाहन ही बाहेर काढू नये. अत्यावश्यक सेवा याचा अर्थ लोकांनी समजून घ्यावा. विनाकारण किरकोळ गोष्टीसाठी अत्यावश्यक म्हणून बाहेर पडून प्रशासनाचा व आपला वेळ वाया घालवू नये.
बहुसंख्य लोक कायद्याचं पालन न करताना आढळून येत आहेत परंतु काही लोक सकाळी मॉर्निंग वॉक/ सायंकाळी व्यायामाला जाणे किंवा जेवणानंतर शतपावली करण्यासाठी समूहाने बाहेर पडणे. असे कृत्य करत आहे त्यांच्यावर आम्ही गुन्हे दाखल करीत आहोत आणि याची तीव्रता वाढवणार आहोत.
भविष्यामध्ये एखादी शस्त्रक्रिया करावे लागू नये म्हणून हृदयावर दगड ठेवून छोटेसे इंजेक्शन देण्याचा हा प्रयत्न आहे या कारवाया होताना लोकांना त्रास होत आहे परंतु पोलीसांकडे दुसरा इलाज नाही त्यामुळे कोणीही गैरसमज करून घेऊ नये यावेळेस पोलिसांतर्फे एकच आम्ही आव्हान करू शकतो नियम पाळा आदेशाचे उल्लंघन करू नका आणि करुणा प्रसाद थांबवण्यास मदत करा
आपल्या भागामध्ये बाहेरून कोरोनाच्या रुग्णाचा प्रवेश होऊ नये म्हणून आपली हालचाल थांबवण्याचा हा प्रयत्न आहे जर आपल्या भागामध्ये करुणा पेशंट सापडला तर आपल्या भागाचा बफर भाग म्हणून घोषित करण्यात येतो सर्व बाजुने पोलिस लावावी लागतात अत्यावश्यक सेवा बंद करावे लागतात आणि कुणालाही घराबाहेर पडू दिले जात नाही आणि त्यामध्ये जे नियम पाळतात त्यांनासुद्धा निष्कारण सजा भोगावी लागते म्हणून आम्ही याप्रकारे कारवाया करणार आहोत करत राहणार आहोत कुणीही गैरसमज करून घेऊ नका आपला कोणताही भाग सील करण्याची वेळ येऊ नये म्हणून हा सर्व खटाटोप सुरू आहे आपण नियम पाळा आता जरी अंधार वाटत असला तरी पहाट झालेली आहे सूर्योदय नक्की होईल
कोणत्याही परिस्थितीमध्ये दौंड तालुक्यामध्ये कोरोना विषाणूस आम्ही प्रवेश करू देणार नाही. आमच्या या दृढ विषयांमध्ये अनेक नागरिक (त्यामध्ये काही स्थानिक पुढारी व प्रतिष्ठित लोक) अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु त्यांच्या विरोधात आम्ही कायद्याचा बडगा उगारून आमचा निश्चय तडीस नेऊ-पोलीस निरीक्षक सुनील महाडिक(दौंड)