Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

आपल्या पगारातून 121 कुटुंबांना किराणा वाटप चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन चा उपक्रम

0
11 0
Read Time2 Minute, 33 Second

चाळीसगाव(प्रतिनिधी):-आज दि 30 मार्च रोजी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन तर्फे 121 कुटुंबांना 19 प्रकारचा किराणा वाटण्यात आला किराणा मध्ये 5 किलो गहू,5 किलो तांदूळ,1 किलो शेंगदाणे,1 किलो सोयाबीन तेल,1 किलो मीठ,1 किलो मसूर डाळ,1किलो साखर,टूथपेस्ट,अंघोळीचा साबण,कपड्यांचा साबण,भांड्यांचा साबण,पॅराशूट तेल,चहा पावडर,हळद,मसाला पावडर,मिरची पावडर,जिरे,मोहरी प्रत्येकी 1 नग,बिस्कीट 2 नग हा सर्व प्रकारचा किराणा सामान 121 गरीब कुटुंबांना देण्यात आला यावेळी dysp गावडे साहेब,शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड,स पो नि मयूर भामरे,स पो नि महावीर जाधव व पोलीस स्टेशन चाळीसगाव चे सर्व कर्मचारी उपस्थित होते व या कार्यासाठी संपूर्ण पोलीस कर्मचारी वर्गाने आपल्या पगारातून आपल्या परीने मदत केली आहे.

dysp गावडे साहेब

आमच्यात सुद्धा एक सामाजिक कार्यकर्ता असतो पण योग्य वेळ आल्यास आम्ही नक्की सामाजिक कार्य करत असतो आणि आमच्या वर असलेल्या समाजाच्या जबाबदाऱ्या पाळण्यासाठी कठोर निर्णय ही घ्यावे लागतात तरी लोकांनी घरात राहून शासन निर्णयाचा आदर करावा आम्ही ही मदत गरजू गरीब परिवारांना आमच्या सर्व कर्मचारी वर्गाच्या मदतीने केली आहे

पोलीस निरीक्षक ठाकुरवाड साहेब

आम्ही स्वस्फूर्तीने हे कार्य केलेले आहे आम्ही समाजाचे देने लागतो या भावनेने मदत केली आहे तसेच गोर गरीब कुटुंब ज्यांना या लॉकडाऊन मूळे कामाला जात येत नाही अश्या कुटुंबाचा शोध घेऊन मदत केली आहे ही मदत आमच्या सर्व चाळीसगाव पोलीस स्टेशन च्या कर्मचारी वर्गच्या मदतीने करू शकलो

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: