आप चे नेते मनीषजी सिसोदिया यांची अटक राजकीय सूड भावनेने-जिल्हाध्यक्ष तुषार निकम आप

संपादक गफ्फार मलिक(शेख)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)- मनीषजी सिसोदिया यांची भाजपा सरकारने केलेली अटक ही सत्तेचा दुरुपयोगातून केलेली असल्याचे आरोप करत दि 28 फेब्रुवारी रोजी आम आदमी पार्टी जळगांव जिल्हा तर्फे चाळीसगाव येथे तहसीलदारांना निवेदन देत निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी जळगाव जिल्हाध्यक्ष तुषार निकम यांनी मनीषजी सिसोदिया यांची भाजपा सरकारने केलेली अटक राजकीय सूड भावनेने केलेली आहे.यामुळे आम आदमी पार्टी जळगाव जिल्ह्यातर्फे तहसीलदार अमोल मोरे यांना निवेदन देऊन या अटकेचा जाहीर निषेध करण्यात येत आहे तसेच हा लोकशाही संपवण्याचा व विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न आहे ही पुढील पिढ्यांसाठी धोक्याची घंटा आहे.त्यामुळे अशा केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला असल्याचे सांगितले.
यावेळी जिल्हाध्यक्ष – तुषार निकम, चाळीसगाव यांच्या सोबत माजी तालुकाध्यक्ष – सचिन राणे, योगेश निकम, चाळीसगाव शहर सचिव – डॉ. पंकज पाटील, शेख वाहेद मोहम्मद, हमजाखान आसिफखान,
शोएब शेख, वैभव पाटील, ललित भिडे, विनोद मोरे इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी हे निवेदन देताना उपस्थित होते.