Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

आमदार मंगेशदादा चव्हाण ५ दिवसांच्या लंडन येथील अभ्यास दौऱ्यासाठी रवाना…

0
0 0
Read Time4 Minute, 16 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

उपसंपादक रोहित शिंदे

राज्यातील १२ आमदारांसह जगप्रसिद्ध वेल्स विश्वविद्यालयातील कार्यशाळांमध्ये सहभागासह संसद सभागृहांना देणार भेटी,

शिवरायांची वाघनखे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारक व महात्मा गांधी यांचे स्मारक यांना करणार अभिवादन

मुंबई(वृत्तसेवा) – जगभरातील विविध क्षेत्रांचा, तंत्रज्ञानाचा तसेच समाजोपयोगी धोरणांचा अभ्यास करण्यासाठी विधिमंडळातील आमदारांचे अभ्यास दौरे आयोजित केले जातात. यावर्षी लंडन येथील जगप्रसिद्ध वेल्स ट्रिनिटी सेंट डेव्हिड (UWTSD) निमंत्रणावरून महाराष्ट्रातील १२ आमदारांचे शिष्टमंडळ दि.२० ते २५ नोव्हेंबर २०२३ दरम्यान ब्रिटन (युके) येथे अभ्यास दौऱ्यावर जाणार आहे. यात चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांची देखील निवड झाली असून ते दि.१९ रोजी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून सकाळच्या विमानाने लंडन रवाना झाले आहेत. प्रदीर्घ कालावधीनंतर विधिमंडळाच्या अभ्यास दौऱ्यासाठी चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाला प्रतिनिधित्व मिळाल्याने आमदार मंगेशदादा चव्हाण यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

या अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने वेल्स, यूके येथील विद्यापीठात सुशासन आणि सार्वजनिक धोरण या विषयावरील कार्यकारी कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. वेल्समधील UWTSD च्या लॅम्पीटर कॅम्पसमध्ये, विविध सांस्कृतिक भेटींबरोबरच सुशासन आणि सार्वजनिक धोरण या विषयांवर आणि आसपासच्या अनेक दिवसांच्या कार्यशाळांचा भाग आमदार असतील. या कार्यक्रमात कार्डिफमधील सेनेड असेंब्लीला आणि वेस्टमिन्स्टर येथील संसदेच्या सभागृहांना भेट देणे देखील समाविष्ट आहे. कार्यक्रमाची समाप्ती व्हाईटहॉलमधील नॅशनल लिबरल क्लबमध्ये औपचारिक डिनरद्वारे केली जाणार आहे.

शिवरायांची वाघनखे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारक व महात्मा गांधी यांचे स्मारक यांना देणार भेटी

छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनखांनी अफजलखानाचा वध केला होता ते वाघनखे ठेवण्यात आलेल्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियमला आमदारांचे शिष्टमंडळ भेट देणार असून आपल्या महाराष्ट्राच्या एका दैदिप्यमान अश्या इतिहासाची खून असणाऱ्या शिवरायांच्या वाघनखांचे दर्शन यानिमित्ताने होईल, यासोबतच पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रयत्नांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडन येथील निवासस्थानाचे भव्य स्मारकात रुपांतर करण्यात आले आहे, सदर स्मारकाला तसेच लंडन येथील महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्याला देखील आमदारांचे शिष्टमंडळ अभिवादन करणार आहेत.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: