आमदार राहुल कुल यांच्या हस्ते खासगी पशुवैद्यकीय डॉक्टरांचा कोविड योद्धा हा पुरस्कार देऊन सन्मान
दौंड(प्रतिनिधी)-खासगी पशुवैद्यकीय डॉक्टरांचा भारतीय जनता पार्टी दौंड तालुका पोलीस फ्रेंड्स वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानाने आमदार राहुल कुल यांच्या हस्ते कोविड योद्धा हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले संचार बंदीच्या काळात पशुवैद्यकीय डॉक्टर बंधू-भगिनींनी शेतकऱ्यांचा मुख्य आधार असलेल्या पशुधनाची काळजी घेण्यासाठी तत्परतेने सेवा दिली त्यांची सेवा सहकार्य नक्कीच वाखाणण्यासारखी आहे यासाठी त्यांचे अभिनंदन केले येणाऱ्या काळात देखील हे मोलाचे कार्य सुरू होईल अशी अपेक्षा यावेळेस डॉक्टर सुदर्शन खळदकर सदस्य महाराष्ट्र राज्य खासगी पशुवैद्यकीय सेवा संघ डॉक्टर संतोष बडेकर जिल्हाध्यक्ष डॉक्टर राहुल चव्हाण तालुकाध्यक्ष सचिन गुंड अध्यक्ष पोलीस फ्रेंड्स वेल्फेअर असोसिएशनचे दौंड तालुका डॉक्टर डाँ.संदिप भोंगळे तालुका कार्याध्यक्ष हे उपस्थित होते