आमदार राहुल कुल यांनी दौंड तालुक्यातील उपाययोजना संदर्भात घेतली राज्यपालांची सदिच्छा भेट.
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
दौंड प्रतिनिधी-पवन साळवे
राज्यपाल मा. श्री.भगतसिंग कोश्यारी यांची आमदार राहुल कुल यांनी आज सदिच्छा भेट घेतली.कोरोनाचा सामना करत असताना व संचारबंदीमुळे गोर गरीब जनता, कामगार, कष्टकरी,मजूर, व हातावर पोट असलेल्या छोट्या मोठया विक्रेत्यांचा समस्यांची दखल घेऊन शासनाने लवकरात लवकर विशेष पॅकेज जाहीर करावे तसेच प्रशासन आणि शासन यामध्ये समन्वय साधत योग्य निर्णय घेण्यात यावे,पोलीस व सार्वजनिक आरोग्य विभागावरील ताण कमी करावा, ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांकडे विशेष लक्ष द्यावे अशी विनंती करण्यात आली.
कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्यात स्थानिक पातळीवर सुरु असलेल्या विविध उपाययोजनां संदर्भांत माहिती दिली.राज्यपाल महोदयांशी जलसंपदा , अवयवदान, वन विभाग आदी विषयांवरील देखील सकारात्मक चर्चा झाली प्रसंगी खासदार मा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार मा. जयकुमार गोरे उपस्थित होते.