Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

आयपीएल वर सट्टा 3 आरोपींसह 95 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त.

0
0 0
Read Time2 Minute, 44 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

जळगाव- आयपीएल ची क्रिकेट स्पर्धा जोरदार सुरू असून अनेक ठिकाणी आयपीएलवर सट्टा खेळला जात असल्याचे प्रकार उघड होत आहे. जळगाव शहरात सुद्धा आयपीएलवर सट्टा घेणाऱ्यांवर सहाय्यक अधिक्षकांच्या पथकाने एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने फातेमा नगरात दि 17 मार्च रोजी छापा टाकत 3 आरोपींना ताब्यात घेत सट्टेबाजी साठी वापरत असलेले मोबाईल,रोकड व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.

सविस्तर वृत्त असे की जळगावातील फातेमा नगरात आयपीएल मॅचेसवर सट्टा घेतला जात असल्याची गुप्त माहिती सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा यांच्या पथकाला मिळाली होती. रविवारी सायंकाळी जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक किशोर पवार, मीनल साकळीकर, रवींद्र मोतीराया, महेश महाले यांच्या पथकासह एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या पथकातील अतुल वंजारी, इम्रान सैय्यद, सचिन पाटील, योगेश बारी यांनी आयेशा किराणाजवळ छापा टाकत पथकाने केलेल्या कारवाईत इम्रान अमीन खान वय-40 रा.चिखली ह.मु.फातेमा नगर, वसीम सैय्यद कामरोद्दीन वय-38, जावेद नबी शेख वय-30 रा.फातेमा नगर यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून 40 हजार 600 रुपये रोख आणि 5 मोबाईल,टीव्ही व इतर साहित्या असा एकुण 95 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. जळगावात यंदाच्या आयपीएलमध्ये करण्यात आलेली ही पहिलीच कारवाई आहे. तिघांविरुद्ध पोलीस नाईक रवींद्र मोतीराया यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र जुगार कायदा कलम 4 व 5 प्रमाणे कायदेशीर फिर्याद दाखल करण्यात आली आहे,याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक इम्रान सैय्यद करीत आहे.

Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: