अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख(मलिक)
चाळीसगाव(प्रतिनिधी)-आळंदी येथे ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूर वारीसाठी प्रस्थान करीत असतांना तेथील पोलीसांनी केलेल्या लाठीचार्ज चा विरोध करत चाळीसगांव तालुक्यातील तिन्ही घटक पक्ष शिवसेना [उध्दव बाळासाहेब ठाकरे] कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच समविचारी पक्ष आणि विविध संघटनांचे पदाधिकारी यांनी संयुक्तपणे नायब तहसीलदार धनराळे यांना दि 13 जून रोजी निवेदन देत झालेल्या घटनेचा निषेध केला.
आळंदी येथे ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूर वारीसाठी प्रस्थान करीत असतांना तेथील पोलीसांनी महाराष्ट्र राज्यासारख्या सुमारे ७०० वर्षांची वारकरी संप्रदायाची परंपरा लाभलेल्या, पुरोगामी राज्यात वारक-यांवर कुठलेही कारण नसतांना लाठीहल्ला करण्यात आला आणि हिंदुत्वाचा मुखवटा परिधान करुन मतांचा जोगवा मागणारे सदर हल्याबाबत जनमानसात चुकीची दिशाभुल करणारी खोटी माहिती सादर करीत आहेत. त्याच्या या अशोभनिय वृत्तीचा आणि कृत्याचा महाविकास आघाडी तर्फे जाहीर निषेध करीत.
राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांनी सदर घटनेची चौकशी करुन वारकरी संप्रदायाच्या उज्वल पंरपरेला जे गालबोट लावले गेले त्याबद्दल संपुर्ण वारकरी संप्रदायाची माफी मागावी व लाठीचार्ज करणा-या सर्व संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.नायब तहसीलदार यांना निवेदन देतांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष दिनेश पाटील,काँग्रेस शहर अध्यक्ष रवींद्र जाधव,रामचंद्र जाधव,प्रमोद पाटील,सुरेश पगारे,हरी नाना खलाने,मंगेश कुमार अग्रवाल,मोहित भोसले,शुभम पवार,गौरव पाटील,मधू आढाव,योगेश पाटील,नितीन परदेशी, कुणाल पाटील,सुधाकर कुमावत,आर के माळी,राकेश ठाकूर,भूषण बोरसे,राकेश राखुंडे,निखिल देशमुख,निलेश गायके,रॉकी धामणे आदी महाविकास आघाडी चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते