4
0
Read Time1 Minute, 15 Second
अधिकार आमचा न्युज नेटवर्क
पिंपरी प्रतिनिधी सनी घावरी
पिंपरी, दि.14 (अधिकार आमचा) : पिंपळे सौदागर येथे ७ जून रोजी विराज जगताप या बौध्द तरुणाची निर्घुण हत्या करण्यात आली. रविवारी सायं सध्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी जगताप यांच्या कुटूंबांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. यावेळी पवार यांनी समाजात जातीय तेढ निर्माण होऊ नये याची खबरदारी घेण्याचे आवाहन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील व विरोधी पक्षनेते नाना काटे उपस्थित होते.
यावेळी विराजच्या आईने सांगितले की आमच्या गावातील ग्रामस्थांची मीटिंग झाली. यामध्ये या घटनेला कोणीही जातीय रंग देऊ नये अशी विनंतीही त्यांनी अजित पवार यांच्यासमोर बोलून दाखवली.
Post Views: 1,740
Related
Average Rating
5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%