अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी गफ्फार शाह
तालुक्यातील टोळी येथील तरूणीवर झालेल्या अत्याचार प्रसंगी संबंधितावर कडक शासन व्हावे असे निवेदन देण्यात आले.
टोळी (ता पारोळा)-येथील 20 वर्षीय तरुणी ही पारोळा येथील लक्ष्मीबाई महाविद्यालयात प्रथम वर्ष विज्ञान शाखेत शिकत होती दिवाळीच्या सुट्टीत पारोळा येथे वास्तव्याला असलेले तिचे मामा त्यांच्याकडे तीन नोव्हेंबर पासून आली होती दिनांक 7 रोजी दुपारी अडीच वाजता मेडिकलवर जाऊन येते असे सांगून घरून निघाली पण बराच उशीरा पर्यंत घरी न आल्याने तिचा सर्वत्र शोध घेता पण तिचा तपास न लागल्याने तिच्या मामांनी पारवा पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद 8 रोजी सकाळी दहा वाजता केली मग सकाळी आठ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास ती जुलूम पुरा येथे बा लालबागच्या मळ्यात विहिरीजवळ बेशुद्ध अवस्थेत आढळून आली यावेळी याठिकाणी काही मुले क्रिकेट खेळत असताना त्यांनीही ही मुलगी दिसली त्यांनी लगेच मोटारसायकलीने तिला पाठवा कुटीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले प्राथमिक उपचार करून तिला पुढील उपचारासाठी धुळे येथे भाऊसाहेब हिरे रुग्णालयात हलविण्यात आले तीन दिवस तिच्यावर उपचार झाले तिने मृत्यूशी झुंज दिली पण दहा रोजी पहाटे चार वाजता तिची प्राण ज्योत विझली सदर घटनेतील आरोपी शिवनंदन पवार त्यासोबत असलेले दोन जण पप्पू अशोक पाटील अशोक रावजी पाटील यांनी आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला आरोपींवर फास्ट ट्रॅक कोर्टात चालू आरोपींना फाशी व्हावी त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी व त्या कुटुंबाला संरक्षण मिळावे व कुटुंबातील व्यक्तींना सरकारने आर्थिक मदत घोषित करावी अशी मागणी चाळीसगाव तालुक्यातील उपेक्षित दलित सामाजिक परिषद संघटन च्या वतीने निषेध नोंदवून तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले
यावेळी उपेक्षित दलित सामाजिक परिषद जिल्हा उपाध्यक्ष तुषार नकवाल,तालुकाध्यक्ष संजय भाकरे , शहराध्यक्ष राहुल नकवाल, चर्मकार उठाव संघ शहराध्यक्ष आनंद गांगुर्डे, सामाजिक कार्यकर्ते श्रीकृष्ण वाघ, सागर गांगुर्डे ,भारत अहिरे ,भरत परदेशी ,राजेंद्र चौधरी ,संदीप नकवाल, विक्की नकवाल ,विशाल खलाले, गणेश शिरसाट, नरेंद्र नकवाल ,कल्पेश येवले, खुशाल भोई भुषण गोयर यावेळी सर्व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते