ऊस तोडणी ला मजूर आले नाहीत रागात मारहाण,एकाच मृत्यू….

Read Time2 Minute, 15 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

दौंड(प्रतिनिधी)- दिनांक 11 जानेवारी 2021 रोजी ऊस तोडीस का केला नाही विचारत दोन मजुरांना मारहाण करण्यात आली यात गंभीर दुखापत होऊन एका मजुराचा मृत्यू तिघांवर गुन्हा दाखल

11 जानेवारी 2021रोजी रात्री 9/00 च्या सुमारास आरोपी 1) घनश्याम भोसले 2) भागवत भोसले 3) सौरभ (पूर्ण नाव माहीत नाही) सर्व राहणार काळेवाडी तालुका दौंड जिल्हा पुणे यांनी फिर्यादी राहत असलेल्या कोपी जवळ मोटरसायकल वरून हातात लोखंडी गज लाकडे घेऊन आज ऊसतोडणी करावयास का गेला आले नाही असे म्हणून लोखंडी गज, लाकडे याने पर्वत गुलसिंग ब्राह्मणे व सुनील सत्यनारायण उर्फ गुलाब शर्मा याला मारहाण केली व सदर मारहाणीत सुनील हा गंभीर जखमी झाल्यामुळे त त्यास औषध उपचारास सिविल हॉस्पिटल अहमदनगर येथे ऍडमिट केले असता उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. भट्टा गुलसिंग ब्राह्मणे वय 24 वर्ष. व्यवसाय – मजुरी राहणार – आमल्या पाणी पोस्ट केली तालुका भगवानपुरा जिल्हा खरगोन राज्य मध्य प्रदेश सध्या राहणार काळेवाडी पहाणे वस्ती तालुका दौंड जिल्हा पुणे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून दि 14 जानेवारी 2021 रोजी आरोपींवर भादवि कलम 302,323,341,506,34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री ऋषिकेश अधिकारी करत आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांची गय केली जाणार नाही पोलीस निरीक्षक नारायण पवार यांचा इशारा
Next post पहिल्या दिवशी सात केंद्रावर 700 आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांना देण्यात येणार लस.जळगांव जिल्ह्यात कोरोना लसीकरणास सुरवात
error: Content is protected !!
%d bloggers like this: