एकनिष्ठ शिवसैनिक ते अल्पसंख्याक शहर प्रमुख पदी वसीम शेख रज्जाक यांची निवड,सामाजिक कार्याची पावती

Read Time3 Minute, 26 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी गफ्फार शाह

चाळीसगाव(प्रतिनिधी)-
शिवसेना चाळीसगाव अल्पसंख्यांक शहर प्रमुख पदी वसीम शेख रज्जाक यांची निवड करण्यात आली.
त्यांच्या बारा वर्षाच्या शिवसैनिक म्हणून कारकिर्दीची दखल घेत पारोळा येथे आमदार किशोर आप्पा पाटील,जिल्हाप्रमुख डॉक्टर हर्षल माने,चिमण आबा पाटील,शिवसेना नेते संजय सावंत, ज्येष्ठ नेते तुकाराम मामा कोळी,रोहिदास लाला पाटील,चाळीसगाव तालुकाप्रमुख रमेश आबा चव्हाण,चाळीसगाव शहर प्रमुख नाना कुमावत, महेंद्र सिताराम पाटील,संपर्कप्रमुख दिलीप घोरपडे,महिला तालुकाप्रमुख सविता ताई कुमावत,रघुनाथ कोळी,सुनील गायकवाड,जिल्ह्याचे शिवसेना, युवा सेना, महिला आघाडी,शेतकरी आघाडी चे सर्व तालुकाप्रमुख शहर प्रमुख,जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य,प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पालक मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वसीम चेअरमन यांची अल्पसंख्याक शहर प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.
वसीम चेअरमन यांनी एक कट्टर शिवसैनिक कार्यकर्ता ते शाखा पदाधिकारी,शाखाप्रमुख,उपशहर प्रमुख असा प्रवास करत शिवसेनेचे शहर प्रमुख नगरसेवक नाना कुमावत यांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेत विविध सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय कामामध्ये आपला समाजसेवेचा ठसा उमटवला त्यांच्या परिसरामध्ये व शहरांमध्ये वसीम चेअरमन जनसेवे मध्ये नेहमीच अग्रेसर असणारे मदत करण्यात नेहमी पुढाकार घेणारे, सामाजिक कार्यात नेहमी योगदान देणारे त्यांना शहराच्या नागरिकांनी प्रेमाने चेअरमन ही पदवी बहाल केलेली आहे. शिवसेनेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी राबविलेले आहेत. कित्येक भांडण तंटे समोपचाराने मीटवलेले आहे. कित्तेक बेरोजगारांना रोजगार देण्याचे काम केलेले आहे. तुटणारे संसार जोडलेले आहे. त्यांच्या सामाजिक व राजकीय कामाची दखल घेत अल्पसंख्यांक शहर प्रमुख पद देण्यात आलेले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज,सेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे व शिवसेनेच्या 20 टक्के राजकारण व 80 टक्के समाजकारण या विचारसरणीनुसार एक कट्टर शिवसैनिक म्हणून जनतेची सेवा करत राहणार असल्याचे वसीम चेअरमन यांनी सांगितले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post दौंड शहर अवैध धंदे बंद मोहीम,15 दिवसापासून धडाकेबाज कारवाईचे सत्र सुरू
Next post काँग्रेस महिला अध्यक्षा अर्चना ताई पोळ यांच्या नेतृत्वाखाली महागाई विरोधात जोरदार मोर्चा
error: Content is protected !!
%d bloggers like this: