काँग्रेस महिला अध्यक्षा अर्चना ताई पोळ यांच्या नेतृत्वाखाली महागाई विरोधात जोरदार मोर्चा
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी गफ्फार शाह
चाळीसगाव(प्रतिनिधी)-काही दिवसांपूर्वी महिला शहर अध्यक्षा पदी अर्चना ताई पोळ यांची निवड झाली असून निवडीनंतर प्रथमच वाढत्या महागाई विरोधात जोरदार मोर्चा काढत पक्षश्रेष्ठींनी योग्य पदाधिकारी निवडला असल्याचे सिद्ध करून दिले.
वाढत्या इंधन दरवाढीचा निषेध मोदी सरकारच्या निषेधार्थ शहरात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. केंद्र सरकारने अचानक पेट्रोल, डिझेल, व गॅस सिलिंडरच्या दरात
प्रचंड वाढ केली आहे. हे दर कमी करण्यात यावे म्हणून काँग्रेसकडून तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी घोषणाबाजीने परीसर दणाणला. हे आंदोलन चाळीसगाव महिला शहर अध्यक्षा अर्चना ताई पोळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार विशाल सोनवणे यांना निवेदन देण्यात आले.
या मोर्चात काँग्रेस महिला जिल्हा उपाध्यक्ष लता खलाणे, काँग्रेस तालुकाध्यक्ष अनिल निकम,शहराध्यक्ष देवेंद्र पाटील, माजी आमदार ईश्वर जाधव, रमेश शिंपी, (अ.जा.) प्रदेश महासचिव राहुल मोरे, शिवाजी राजपूत, युवक काँग्रेसचे
तालुकाध्यक्ष मधू गवळी, शहराध्यक्ष प्रज्वल राजपूत, सोशल मीडियाचे पवनसिंग राजपुत,अलताफ खान, रवींद्र पोळ, रवी जाधव, पंकज शिरोडे व मोठ्या संख्येने काँग्रेसचे पदाधिकारी,
कार्यकर्ते उपस्थित होते.