कापूस चोरी प्रकरणी चोरीसाठी वापरलेली महिंद्रा पिकअप सह 5 आरोपी ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात….

संपादक गफ्फार मलिक(शेख)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)- तालुक्यातील रांजणगाव या गावी शेतातील बंद घरात ठेवलेला कापूस चाेरीला गेल्याची घटना घडली होती. 18 ते 19 नोहेंबर दरम्यान घडलेल्या घटनेनंतर पोलीसांनी 40 दिवसात चोरीत सहभागी असलेल्या 6 चोरट्यांना अटक केली आहे. पोलीसांनी त्याच्याकडून चोरी साठी वापरण्यात आलेली महिंद्रा पिकअप गाडी एम एच 04 डी के 4610 जप्त केली आहे. मनोहर माधवराव पाटे(वाणी) वय 65 वर्षे यांच्या तक्रारीवरून त्यांच्या शेतातील काढलेला अंदाजे 49 हजार रूपय किंमतीचा 7 क्विंटल कापूस रांजणगाव जवळील शेतात घरात ठेवला होता दरम्यान 18 डिसेंबर सायंकाळी 6 ते 19 डिसेंबर सकाळी 9 वाजून 30 मिनिटांच्या दरम्यान कापूस चोरी गेल्याची घटना घडली होती. चोरीच्या या घटनेनंतर ग्रामीण पोलीस ठाण्यात भा द वी कलम 454,457,380 गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस प्रशासनाने तपास चक्र फिरवत सी डी आर/एस डी आर व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अजय जयवंत पाटील वय- 25 वर्षे रा रांजणगाव,प्रकाश उर्फ मुन्ना लक्ष्मण पाटील वय 21 वर्षे रा रांजणगाव,चंद्रकांत उर्फ बंटी गोकुळ मोरे वय 25 वर्षे रा पिलखोड,शालीक अरुण पाटील वय 25 वर्ष रा रांजणगाव, सुरेश उर्फ पप्पु राजेंद्र कोष्ठी वय 26 वर्ष रा रांजणगाव यांना ताब्यात घेत त्याची चाैकशी केली असता,त्यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले असून या 5 आरोपींव्यतिरिक्त एक अल्पवयीन आरोपीचा देखील यात सहभाग आहे.5 आरोपींना पुढील तपासासाठी न्यायालयात हजर करून चार दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली आहे ही कामगिरी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लोकेश पवार,सहाय्यक फौजदार राजेंद्र साळुंखे,हे कॉ नंदलाल परदेशी,पो ना शंकर जंजाळे, पो ना मनोज पाटील,पो ना संदीप माने,पो ना भुपेश वंजारी यांच्या पथकाने केली व पुढील तपास सहाय्यक फौजदार राजेंद्र साळुंखे हे करीत आहे.