किरकोळ वादातून तरुणाचा खून,तीन आरोपींना अटक….

Read Time2 Minute, 8 Second

अधिकार आमचा न्यूज पोर्टल

सनी घावरी
काल शुक्रवारी मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास
बळवंतनगर, चिंचवडेनगर प्रेम सायबू लिंगदाळे (वय 21, रा. चिंचवड) या तरुणाचा खून झाला आहे,आरोपी राकेश सूर्यवंशी, मॅडी मडीवाल गणेश खांगटे, गणेश कांबळे,किरण बाबासाहेब चव्हाण (वय 21, रा. चिंचवडेनगर), योगेश फुरडे, दीपक शरद कोल्हे (वय 29, रा. बिजलीनगर, चिंचवड),सागर परीट, अनंत अजिनाथ साठे (वय 27, रा. चिंचवडेनगर) यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी अनंत, दीपक आणि किरण या तिघांना ताब्यात
घेतले आहे. शिवानंद शंकर हेळवे (वय 23, रा.चिंचवड) याने
या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिवानंद हेळवे यांच्या तोंड ओळखीचा मॅडी मडीवाल यास फिर्यादी व त्याच्या मित्रांनी हाताने व लाथाबुक्याने मारहाण करुन त्यांच्या रिक्षाचे नुकसान केले होते. त्याच मारहाणीचा राग मनात धरुन मॅडी व त्याचे साथीदार मित्र राकेश सूर्यवंशी, गणेश खांगटे, गणेश कांबळे, किरण चव्हाण,
सागर परीट, दीपक कोल्हे,अनंत साठे यांनी बळवंतनगर,
चिचवडेनगर येथील बालाजी निवास समोर प्रेम याच्या डोक्यात कोयते व धारदार शास्त्राने वार करुन त्याला गंभीर जखमी केले. त्यातच प्रेमचा मृत्यू झाला. पुढील तपास चिंचवड पोलीस करीत आहेत.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post १९ फेब्रुवारी २०२१ला शिवरायांच्या पुतळ्याचे लोकार्पण होणार संभाजी सेनेच्या शिष्टमंडळाला नगराध्यक्षांचे आश्वासन
Next post “वॉशिंग सेंटर” या वेब सिरीज चे पोस्टर रिलीज
error: Content is protected !!
%d bloggers like this: