अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार मलिक(शेख)
चाळीसगाव(प्रतिनिधी)- किरण कुमार बकाले हा विकृत व मराठा द्वेषी जळगाव एलसीबीचा निलंबित पोलीस निरीक्षक याने मराठा समाजाच्या महिलांच्या विरोधामध्ये अत्यंत गलिच्छ व विकृत घाणेरडे वक्तव्य करून मराठा समाजाची बदनामी किरण कुमार बकाले याने केल्याने समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याने बकालेला सेवेतून बडतर्फ करून अटक करण्यात यावी यासाठी चाळीसगाव तहसील कार्यालया समोर दि ९ रोजी सकाळी ९ ते २ वाजेपर्यंत सकल मराठा समाजाने साखळी आंदोलन केले.
मराठा समाज हा सर्व समाजांना सोबत घेऊन जाणारा समाज आहे. वर्षांनूवर्ष मराठा समाजाने महाराष्ट्राचा गावगाडा हाकलेला आहे. देशाच्या व राष्ट्राच्या जडणघडणीमध्ये मराठा समाजाचे योगदान खूप मोठे आहे. मराठा समाज हा महाराष्ट्रामध्ये मोठ्या भावासारखे काम करतो. या मराठा समाजाच्या विरोधामध्ये किरण कुमार बकाले या जळगाव एलसीबीच्या पोलीस निरीक्षकाने अत्यंत खालच्या दर्जाची टिपणी करून समाजातील महिलांची बदनामी केलेली आहे. याप्रकरणी तात्काळ किरण कुमार बकलेला सेवेतून बडतर्फ करून अटक करण्यात यावी या मागणी साठी साखळी आंदोलनाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या वतीने करत आहोत. पोलीस महानिरीक्षक नासिक व जळगाव पोलीस अधीक्षक यांची किरणकुमार बकाले ला अटक करणे त्यांचे कर्तव्य असताना जाणूनबुजून बकाले ला वाचविण्याचे प्रयत्न करत आहेत सायबर गुन्हे शाखेच्या माध्यमातून मोबाईल लोकेशन व सी डी आर व एस डी आर लोकेशन द्वारे पोलीस अट्टल गुन्हेगारांना शोधून काढतात मग बकालेला का शोधू शकत हे सर्व गौडबंगाल पोलीस प्रशासनाचे मराठा समाजाला ज्ञात आहे जर त्याला बडतर्फ करून अटक केली नाही तर राज्यभर मराठा समाज तीव्र आंदोलन पुकारेल याप्रसंगी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी शासन व पोलीस प्रशासनाने जबाबदार राहणार असल्याचे सकल मराठा समाजाच्या वतीने चाळीसगाव तहसील कार्यालय समोर दि ९ रोजी साखळी आंदोलन करण्यात आले आहे,गणेश पवार,विजय पाटील,खुशाल बिडे ,डी एस मराठे,सुमित भोसले,संतोष निकुंभ, संजय कापसे,सचिन स्वार,पंकज पाटील,खुशाल पाटील,भाऊसाहेब पाटील,राजु मोरे,सुनील पाटील,सागर पाटील,राकेश राखुंडे ,किशोर पाटील,चेतन वाघ,पप्पू मगर ,सुधीर शिंदे,देवेंद्र पाटील,सुदर्शन देशमुख,पंकज रणदिवे,दिनकर कडलग,राजेंद्र शिंदे,सतीश पवार,अनिल पवार,अमोल पवार,बंडु पगार,कुशल देशमुख,नाना कापसे ,सुनील गायकवाड,माळशेवगे दीपक पाटील,विनायक मांडोळे ,प्रदीप देशमुख,गोकुळ पाटील,विलास मराठे,स्वप्नील गायकवाड,मुकुंद पवार,छोटु अहिरे,दिपक देशमुख,प्रदीप मराठे,नाना तांबे,जी जी वाघ,राकेश बोरसे,निवृत्ती कवडे,अनिल कोल्हे,ज्ञानेश्वर कोल्हे, मराठा भगिनी जयश्री रणदिवे,प्रतिभा पवार,आरस्ता माळतकर , मिलन देशमुख ,रेखा गायकवाड ,अनिता दुसिंग, मनीषा गायके, संगीता जाधव, अलकनंदा भवर, मनिषा महाजन, रत्नमाला जाधव,भडगाव येथील योजना पाटील,मीना पाटील यांच्यासह समाज बांधव सहभागी झाले होते.
याप्रसंगी व्यापारी असोसिएशन अध्यक्ष प्रदीपदादा देशमुख,प स मा सभापती संजय भास्कर पाटील,धनंजय मांडोळे ,मा नगरसेवक सुरेश स्वार , संजय पाटील,शेखर देशमुख,देवळी मा सरपंच अतुल पाटील,शेतकरी कृती समिती विवेक रणदिवे ,स्वाभिमानी शेतकरी संघटना के आर पाटील ,डॉ सुनील राजपूत,ॲड भागवत पाटील,स्वप्नील जाधव,आर पी आय आनंद खरात अदि तर आम आदमी पार्टीचे ॲड राहुल जाधव यांनी आंदोलनाला पाठिंब्याचे पत्र दिले.