अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड-दि 5 सप्टेंबर 2020 शनिवार रोजी दौंड व आसपासच्या ग्रामीण भागातील कोरोनाचा पादुर्भाव वाढत चाललेला आहे. ते रोखण्यासाठी दौंड पोलीसांनी श्री.सूनिल महाडीक (पोलीस निरीक्षक) यांच्या मार्गदर्शनाखाली दौड शहरात व ग्रामीण भागात विनामास्क, डबल-ट्रिपल शिट दुचाकी वर मोकाट फिरणे यांच्यावर दौंड पोलीसांनी दंडात्मक कारवाई करून 31100 रू दंड वसुल करण्यात आला. त्या मध्ये एकुण 67पावत्या त्यापैकी 59 पावत्या 500 रू प्रमाणे व 08पावत्या 200रू प्रमाणे असा एकुण 31100 रू दंड वसुल करण्यात आला. अशी माहिती श्री. सुनिल महाडीक (पो.निरीक्षक) यांनी दिली. या कारवाई मध्ये PI सुनिल महाडीक,PSI खरात साहेब,पो.हवा. सुळ,शेख,सय्यद ,केकान,पो.ना.दाभाडे,जाधव,रवी काळे,पो. काँ.घोडके,कडाळे,वाघ ,गाढवे,गवळी,पवार,शिंदे,अमोल देवकाते,राऊत, महिला पोलीस भवार मँडम यांनी सहभाग घेतला होता. तसेच कुरकुंभ व रावणगाव पोलीस चौकीने सहभाग घेतला होता.