दौंड दि 5(प्रतिनिधी):-कोरोना वारीअर्स साठी हक्काचा आवाज, जगभरात परस्थिति पाहता कोविड 19 म्हणजेच कोरोना वायरस डीसीस ने जगभरात थैमान घातला आसुन लाखोच्या संखेने लोक संक्रमित होत आहे व् हजोराच्या संखेने लोक मरत आहे अशा परस्थिति आपल्या देशातील प्रत्येक नागरिकांनी कोरोना वायरस शी लढ़ा चे रणांगण फुंकले आहे त्याच् बरोबर आपल्या देशातील सरकारी कर्मचारी खास करून पुलिस प्रशासन, नगरपालिका,महानगरपालिका डॉक्टर्स, नर्सेस इत्यादि अधिकारी व कर्मचारी वर्ग कोरोना वारीअर्स ठरलेला आहे कुठल्याही परस्थितिला न घबारता हे कोरोना वारीअर्स अपला व आपल्या कुटुंबाचा जिव धोक्यात घालून अहो रात्र काम करत आहेत. 8 तासाचि ड्यूटी आज ते तब्बल 18 ते 20 तास करत आहेत. कोरोना वारीअर्स चे मानेल तेवढे आभार कमीच आहे तरी सरकारी कर्मचारी नगरपालिका,पोलिस कर्मचारी , डॉक्टर्स,नर्सेस,जे अशा परस्थितीत वेळेपेक्षा जास्त ड्यूटी करत आहेत त्याना ओवरटाइम मानधन व त्यांच्या जिवास कोरोना मुळे काही हानि झाली तर त्यांच्या कुटुंबास 50 लाख रु मिळावे किंवा त्यांच्या दांपत्यास नौकरी मिळावी अशी मागणी भारिप बहुजन महासंघ यांनी निवेदना द्वारे दौंड मुख्याधिकारी यांना केली आहे. निवेदन देतेवेळी सोशल डिस्टैंसिंग चे पालन करत दौंड तालुका अध्यक्ष आश्विन वाघमारे व् दौंड शहर अध्यक्ष अनिकेत मिसाळ उपस्तित होते.