क्राईम अँड करपशन कंट्रोल असोसिएशनच्या तक्रारीची वरीष्ठ स्तरावरून गंभीर दखल,चौकशी सुरू…

0 0
Read Time3 Minute, 27 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी गफ्फार शाह

चाळीसगाव(प्रतिनिधी)-क्राईम अँड करप्शन कंट्रोल असोसिएशनच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहिती नुसार वनपरिक्षेत्र अधिकारी (पाटणा ) श्री.एम.डी.चव्हाण तसेच त्यांचे सहकारी वनमजुर जगन मोरकर व वनमजुर रामचंद्र पाटील यांनी संगन मताने , दिनांक २६/१२/२०२० रोजी पाटणादेवी अभयारण्य (संरक्षित क्षेत्र) येथे दिवसा ढवळ्या पथीकाश्रम येथील जुन्या नर्सरीतील काही जिवंत झाडांची इलेक्ट्रिक कटर च्या सहाय्याने कत्तल केली व दुसऱ्या दिवशी ट्रॅक्टर ट्रॉलीच्या साहाय्याने पिंपरखेड येथील एका लाकूड व्यापारास रुपये तीस हजाराला(30000) विकली. ही अतिशय गंभीर बाब समजताच क्राईम अँड करप्शन कंट्रोल असोसिएशनच्या जिल्हा अधिकाऱ्यांनी क्राईम अँड करप्शन कंट्रोल असोसिएशनच्या राष्ट्रीय मुख्य तपास अधिकाऱ्यांना सदर तक्रार पाठवली तक्रारीची गंभीरता लक्षात घेऊन त्वरित राष्ट्रीय अध्यक्ष दिनेश गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली प्रधान मुख्य वन संरक्षक ( वन्यजीव) नागपूर तसेच अपर प्रधान मुख्य संरक्षक पश्चिम विभाग मुंबई , विभागीय वन अधिकारी औरंगाबाद तसेच श्री राजेश ठोंबरे मानद वन्यजीव रक्षक जळगाव यांना सदर तक्रार दिनांक ०२/०१/२०२१ रोजी पुराव्यानिशी सादर केली होती. यात भारतीय दंड संहिते नुसार संरक्षित क्षेत्रात असे कृत्य करणे हा दंडनीय अपराध आहे .

वन्य जीव संरक्षण अधिनियम 1972 कलम नुसार काल दिनांक २८/०१/२०२१ रोजी तक्रारी प्रकरणी सहाय्यक वन संरक्षक वन्यजीव (कन्नड) श्री. एस. पी . काळे यांनी अवैध वृक्षतोड व विनापरवाना वन उपज अवैध रित्या वहातुक केल्या प्रकरणी धाड टाकून ट्रॅक्टर व करवत ,कटर ,मशिन ,कु-हाड जप्त करण्याची कारवाई करण्यात आली. औरंगाबाद येथील विभागीय वन अधिकारी श्री विजय सातपुते यांच्या मार्गदर्शना खाली या प्रकरणा बाबत धडक कारवाई सुरू झाली आहे . त्याचाच एक भाग म्हणून या गंभीर गुन्ह्यात वापरलेले आणि तक्रारीत नमूद केलेले वाहन साहित्य जप्त करण्यात आले आहे. लवकरच तक्रारीत नमूद या गुन्ह्यातील सहभागी असणाऱ्यांना सखोल चौकशी अंती त्याच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे .

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.