खाकी वर्दीतली माणुसकी दौंड पोलिसांनी घडविले माणुसकीचे दर्शन.

Read Time3 Minute, 55 Second

(अधिकार आमचा न्यूज नेटवर्क)


दौंड प्रतिनिधी-पवन साळवे


दौंड:कोरोना नावाच्या विषाणूने संपूर्ण जगात थैमान घातले व त्याचा जास्त प्रभाव महाराष्ट्र मध्ये दिसून येत आहे.प्रत्येक जिल्ह्यातील परप्रांतीय मजूर आपल्या राज्यात जाण्यासाठी आटापिटा करत आहे जे भेटेल त्या वाहनांनी जाण्याचा प्रयत्न करत आहे अक्षरशः लहान लहानग्या मुला बाळांना घेऊन पायी चालत घेऊन निघाले आहे महाराष्ट्रातील प्रत्येक क्षेत्रात परप्रांतीय मजूर काम करीत आहेत अनेक लोग टॅक्सी, तर कोणी छोट्या मोठ्या कारखान्यामध्ये तर कोणी लघुउद्योग,हॉटेल,सोसायटीमध्ये सुरक्षा रक्षक, फळ विक्रेता, किरकोळ भाजी विक्रेता असे अनेक क्षेत्रात परप्रांतीय मजूर काम करत आहेत.असाच एक प्रकार दौंड तालुक्यातही घडला आहे आणि त्या घटनेला माणूसकी चे दर्शन दौंड पोलिसांनी घडवून आणले.दिनांक-१४/०५/२०२० रोजी दौंड तालुक्यातील कुरकुंभ एम आय डी सी मधील क्लीनसायन्स,हेंकेल, हार्मोनि,सीप्ला,इटरणीस,मोठं मोठ्या कंपन्यामधील मजुरही आपल्या गावी जाण्यासाठी हवालदिल झाले आहेत व ते सर्व पायी जाण्यासाठी निघाले असता.दौंडचे कर्तव्यदक्ष पोलिस कर्मचारी पो ना बापू रोटे व पो कॉ अक्षय घोडके,पो कॉ गणेश कडाळे हे जागरूकतेने कार्य करीत असताना त्यांना सायंकाळी ६:३० वाजताच्या सुमारास काही मजूर पायी चालत जाताना दिसले त्यांनी त्यांना विचारले कुठे जात आहेत त्यांनी सांगितले आम्ही आमच्या गावी उत्तर प्रदेशात जात आहोत लगेच पतित पावन संघटनेचे अध्यक्ष राजेश पाटील यांच्याशी संपर्क करून त्या सर्व मजुरांना जेवणाची व्यवस्था करून दिली. व या सर्व घटनेची माहिती घेऊन त्वरित दौंडचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक यांना या घटनेची माहिती दिली व त्वरित दौंड तहसीलदार संजय पाटील यांना संपर्क करून खाजगी ट्रॅव्हल्स ने त्या मजुरांना उत्तर प्रदेश मधील गोरखपूर येथील कुशीनगर व देवरिया जिल्ह्यामध्ये सोडण्यासाठी परवानगी अथवा पास उपलब्ध करून घेतला व लगेच जगताप ट्रॅव्हल्स चे मालक जयंत जगताप व अरविंद जगताप यांना घटना सांगितले व लगेच त्यांनी बस देण्यास होकार दिला एकूण 43 मजुरांना सोडण्याची पूर्व तयारी दाखवली व दौंडचे डी वाय एस पी ऐश्वर्या शर्मा यांनी रात्री 12 वाजता त्या सर्व मजुरांची भेट घेऊन सर्व घटनेची विचारपूस केली.व पोलिस कर्मचाऱ्यांचे कौतुकही केले.व हिरवा झेंडा दाखवून चालक-राजू जाधव यांच्या सोबत बस उत्तरप्रदेश ला रवाना केली.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post चाळीसगाव व्यवसिकांवर दंडात्मक कारवाई लोकांच्या आरोग्य चांगले व लोक सुरक्षित राहावे या हेतूने कारवाई
Next post चाळीसगावकरांना दिलासादायक बातमी
error: Content is protected !!
%d bloggers like this: